ETV Bharat / bharat

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी उद्या हलवा समारंभाचे आयोजन, जाणून घ्या हलवा समारंभ का आयोजित केला जातो?

बजेट तयार झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी त्यांचे हलवा खाऊ घालून तोंड गोड केले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी हलवा समारंभ 26 जानेवारी रोजी आयोजित केला जाईल.

author img

By

Published : Jan 25, 2023, 12:44 PM IST

halwa ceremony
हलवा समारंभ

नवी दिल्ली : अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या लॉक-इन प्रक्रियेपूर्वी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत उद्या हलवा समारंभ आयोजित केला जाईल. हा समारंभ केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीचा शेवटचा टप्पा असतो. कढईत हलवा ढवळून अर्थमंत्री या समारंभाची सुरुवात करतील. त्यानंतर हा हलवा दिल्लीतील मंत्रालयाच्या मुख्यालयात त्यांच्या सहकाऱ्यांना वाटल्या जातो.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी खास आहे कारण 2023 आणि 2024 ही निवडणूक वर्षं आहेत. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचवेळी पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या सगळ्याशिवाय महागाई शिगेला पोहोचली आहे. लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाकडून जनतेच्या विशेष अपेक्षा आहेत. सरकारकडून सर्वसामान्यांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत.

हलवा समारंभ का आयोजित केला जातो? : भारतीय परंपरेत कोणत्याही शुभ प्रसंगी प्रथम मिठाई खाणे चांगले मानले जाते. अर्थ मंत्रालयाचे कर्मचारी अनेक दिवस बजेट बनवण्याच्या कामात गुंतले असतात. बजेट तयार करण्यासाठी बरीच तयारी केली जाते. प्रत्येक डेटा अतिशय बारकाईने तपासला जातो. त्यानंतर बजेटची छपाई आणि पॅकिंगचे काम केले जाते. तसेच या अर्थसंकल्पाची गोपनीयता देखील पाळावी लागते. हे सर्व काम खूप वेळखाऊ आणि मेहनतची असते. बजेट तयार झाल्यावर त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले जाते. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी अर्थसंकल्पाची कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागेल. प्रिंटिंग कर्मचार्‍यांना किमान काही आठवडे नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात प्रिंटिंग प्रेसमध्ये वेगळे राहावे लागेल.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : विश्लेषकांना 2023 च्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ बी गोप कुमार म्हणाले की, 2024 मध्ये केंद्रीय निवडणुकीपूर्वी हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असल्याने तो विशेष असेल. अर्थसंकल्पाचा भर रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीवर आधारित वाढीवर असण्याची शक्यता आहे. गोप कुमार म्हणाले की, घरांसाठी विद्यमान आयकर लाभ वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळू शकते.

हेही वाचा : Union Budget 2023 : आयकर मर्यादा वाढणार का? यंदाच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाच्या या मुख्य अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.