ETV Bharat / bharat

UP Assembly Election : बसपा प्रमुख मायावती आणि सतीश चंद्र मिश्रा यांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर बातमी - Mayavati latest news

बहुजन समाजवादी पार्टी देखील विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी मंथन करत आहे. त्यासाठी पक्षप्रमुख मायावती सतत आढावा बैठकांमध्ये व्यस्त आहे. प्रबळ दावेदारांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, त्यांनी आणि बसपा प्रमुख मायावती यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मायावती आणि सतीश चंद्र मिश्रा
मायावती आणि सतीश चंद्र मिश्रा
author img

By

Published : Jan 11, 2022, 2:17 PM IST

लखनौ - उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांचा ( UP Assembly Election 2022 ) बिगुल वाजला आहे. सर्वंच पक्षांनी कंबर कसली आहे. बहुजन समाजवादी पार्टी देखील विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी मंथन करत आहे. त्यासाठी पक्षप्रमुख मायावती ( BSP Cheif Mayawati ) सतत आढावा बैठकांमध्ये व्यस्त आहे. प्रबळ दावेदारांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, त्यांनी आणि बसपा प्रमुख मायावती यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यूपीत बसपा सरकार स्थापन करेल -

पक्षाध्यक्ष लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करतील. त्याचवेळी, बसपाच्या सरचिटणीसांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला आणि सपाच्या 400 जागा जिंकल्याच्या दाव्याला बगल दिली. ते म्हणाले की यूपीमध्ये बसपा सरकार स्थापन करेल. यासाठी लोक सज्ज होऊन बसले आहेत. आता दावे आणि आश्वासने दिली जात आहेत. मात्र भाजप आणि सपाच्या राजवटीत राज्यातील जनतेला काहीही साध्य झालेले नाही. अशास्थितीत राज्यातील मतदारांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळेच मतदारांचा आता बसपावर विश्वास बसला असून बसपाने नेहमीच सामाजिक न्याय आणि समतेला महत्त्व दिले असल्याची भावना सतीश चंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.