जम्मू : सीमेवर पाकिस्तानचा कट पुन्हा फसला आहे. शनिवारी सकाळी सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करून तो पळवून ( Drone Near Indo Pak Border ) लावला. बीएसएफने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. घटना अर्निया सेक्टरची आहे. ड्रोनमधून शस्त्रे किंवा ड्रग्जची खेप तर सोडली गेली नाही ना, यासाठी संपूर्ण परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:४५ वाजता जवानांना आरएस पुराच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक ड्रोन दिसला. सतर्क जवानांनी त्यावर सुमारे 7 ते 8 गोळ्या झाडल्या, त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परत गेला. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना ड्रोनद्वारे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाठवण्याचा प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे ड्रोन अनेकदा पाहण्यात आले आहेत. मात्र, भारतीय लष्कराच्या सज्ज सैनिकांमुळे त्यांना पाकिस्तानात परतावे लागले आहे. अलीकडच्या काळात अशा घटना वाढल्या आहेत. सीमेजवळ एक बोगदा आणि ऑक्सिजन पाईपही सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
-
Jammu & Kashmir | BSF troops spotted a drone at around 4:45 am near International Border in Arnia Sector of RS Pura, 7 to 8 rounds of bullets were fired and drone went back to Pakistan side: Border Security Force
— ANI (@ANI) May 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu & Kashmir | BSF troops spotted a drone at around 4:45 am near International Border in Arnia Sector of RS Pura, 7 to 8 rounds of bullets were fired and drone went back to Pakistan side: Border Security Force
— ANI (@ANI) May 14, 2022Jammu & Kashmir | BSF troops spotted a drone at around 4:45 am near International Border in Arnia Sector of RS Pura, 7 to 8 rounds of bullets were fired and drone went back to Pakistan side: Border Security Force
— ANI (@ANI) May 14, 2022
अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबच्या सीमेवर पाकिस्तानातून येणारे ड्रोन पाडले होते. हे ड्रोन पंजाबमधील अमृतसर येथे हेरॉईन घेऊन जात होते. सुमारे साडेदहा किलो हेरॉईन ड्रोनमधून पळवण्याचा नापाक प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा : ड्रोनची भारत-पाकिस्तान सीमेवर हालचाल, जवानांनी गोळीबार करताच पाकिस्तानात परतले!