चंडीगड : पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले आहे. पठाणकोटमधील सिंबल साकोल गावाजवळ रात्री साडेबारा वाजता ही कारवाई करण्यात आली.
जवानांकडून गोळीबार : बीएसएफ जवानांना सीमारेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर बीएसफ जवानांकडून घुसखोराला थांबण्याचे निर्देश देण्यात आले, परंतु तो थांबला नाही. धोक्याची जाणीव झाल्यानंतर बीएसएफ जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात घुसखोर जागीच ठार झाला असल्याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्याने दिली.
घुसखोरीचा प्रयत्न : याआधी 11 ऑगस्ट रोजी तारण जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेरेषेजवळ बीएसएफ जवानांनी अशीच कारवाई केली होती. येथील सीमारेषेजवळ एक पाकिस्तानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या जवानांनी स्व:संरक्षणासाठी त्या घुसखोरावर गोळीबार करत त्याला ठार केले.
ड्रग्जची तस्करी : सीमेपलीकडून भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्न केले जातात. नुकतेच पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात पोलिसांनी 3 जणांकडून 12 किलो हेरॉईन जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत 84 कोटी रुपये आहे. मे महिन्यातही बीएसएफ जवानांनी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेरेषेजवळ 2 पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले होते. या घुसखोरांकडे संशयित साहित्य होते. बीएसएफच्या जवानांनी वर्ष 2022 मध्ये सीमेपलीकडून पाठवलेले 22 ड्रोन रोखले. तसेच 316 किलोग्राम ड्रग्ज पकडले.
ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी केली जाते. या प्रकारच्या कारवाया आम्ही उद्ध्वस्त करत आहोत. पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर अशा प्रकारच्या घटना अधिक होत असतात. - गौरव यादव , पोलीस महासंचालक
कुपवाडामध्ये घुसखोरी : लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी हे संयुक्त ऑपरेशन राबवत तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एका दहशतवाद्याला ठार करून घुसखोरीचा प्रयत्न जम्मू काश्मीर पोलिसांनी हाणून पाडला होता. या दहशतवाद्याकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात होता.
हेही वाचा-