जम्मू: जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हवेतून स्फोटकांची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षादलांनी उधळून लावला. पोलिसांनी ड्रोनमधून टाकण्यात आलेले तीन चुंबकीय आयईडी जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंह यांनी सांगितले की, अखनूर सेक्टरमधील कानाचक येथील कंटोवाला- दयारण भागातून खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये पॅक केलेले आयईडी सापडले आहेत. या आयईडीमध्ये टायमर लावले ( BSF detects pakistan drone ) होते.
जम्मू जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर सोमवारी रात्री बीएसएफच्या जवानांनी ड्रोनसारख्या वस्तूचा आवाज ऐकून गोळीबार केला. आवाजाने इकडे तिकडे ड्रोन उडत असल्याचा संशय आला. एक पोलिस पथक तात्काळ तैनात करण्यात आले आणि त्यांनी परिसरात ड्रोनविरोधी मानक कार्यपद्धतीचे पालन केले.
एडीजीपी म्हणाले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलांनी कानाचकच्या दयारण भागात ड्रोन पाहिला आणि त्यावर पुन्हा गोळीबार केला. ते म्हणाले, 'ड्रोनला जोडलेला पेलोड टाकला होता, पण ड्रोनला शूट करता आले नाही.' ते म्हणाले की, आयईडी निष्क्रिय करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : लखनौसह देशातील 6 आरएसएस कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी, एफआयआर दाखल