ETV Bharat / bharat

BSF Nabbed Pakistani Intruder : पाकिस्तानच्या सीमेवरुन भारतात घुसखोरी, सीमा सुरक्षा दलानं आवळल्या पाकिस्तानी घुसखोराच्या मुसक्या - खेकडे पकडण्यासाठी केली घुसखोरी

BSF Nabbed Pakistani Intruder : कच्छमधील हरामानाला परिसरात घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडलं आहे. या घुसखोराकडून एक घुबड जप्त करण्यात आलं आहे. खेकडे पकडण्यासाठी भारतीय सीमेत घुसल्याची माहिती या घुसखोरानं दिल्याचं भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.

BSF Nabbed Pakistani Intruder
घुसखोर मेहबुब अली मोहम्मद युसूफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 1:01 PM IST

गांधीनगर BSF Nabbed Pakistani Intruder : पाकिस्तानच्या सीमेवरुन भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एका घुसखोराच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मुसक्या आवळल्या. मेहबुब अली मोहम्मद युसूफ असं त्या सीमा सुरक्षा दलानं पकडलेल्या घुसखोराचं नाव आहे. ही घटना शुक्रवारी पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवर उघडकीस आली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या घुसखोराला ( Pakistani Intruder ) पकडलं असून सुरक्षा दल आणि गुप्तचर अधिकाऱ्यांचं सयुंक्त पथकत्याची चौकशी सुरु असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

घुसखोराकडून जप्त केला घुबड पक्षी : भारतीय सीमेवर गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सीमेवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे सीमा सुरक्षा दलातील जवानांनी टेहळणी केली, असता, घुसखोरी होत असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या घुसखोराला पकडलं आहे. त्याच्याकडून एक घुबड सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आलं आहे.

खेकडे पकडण्यासाठी केली घुसखोरी : सीमा सुरक्षा दलाचे जवान कच्छ परिसरातील हरामीनाला परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक पाकिस्तानी घुसखोर घुसखोरी करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या घुसखोराला पकडलं असता, तो पाकिस्तानच्या बादिन जिल्ह्यातील सिरानी गावातील रहिवासी असून त्याचं नाव मेहबुब अली मोहम्मद युसूफ असल्याचं उघड झालं. मेहबुब हा पक्षी आणि खेकडे पकडण्यासाठी भारतीय सीमेत घुसल्याचं त्यानं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सांगितलं आहे.

सुरक्षा दल आणि गुप्तचर विभाग करत आहे चौकशी : कच्छमधील हरामीनाला हा पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यासाठी कुख्यात असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान या परिसरात नेहमीच सतर्क असता. हरामीनाला परिसरात संशयास्पध हालचाली दिसून आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला पकडलं. त्याच्याकडून एक घुबड जप्त करण्यात आलं आहे. या घुसखोराची सुरक्षा दल आणि गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

हेही वाचा :

  1. Woman Intruder : पाकच्या संशयित महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी पाडला हाणून, गोळीबारात महिला ठार
  2. Intruder Killed on Border : पठाणकोटच्या सीमेवर एका घुसखोराला कंठस्नान, बीएसएफची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.