इंफाळ: मणिपूरच्या पश्चिम इंफाळ जिल्ह्यात सोमवारी सकाळी दोन सशस्त्र गटांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन ठार तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील कांगचुप परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकिंग जिल्ह्यातील सेरो येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. जखमी बीएसएफ जवान रंजीत यादव यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
#UPDATE | BSF jawan Ct/GD Ranjit Yadav, who sustained bullet injury was evacuated to Jivan Hospital, Kakching where he was declared dead. pic.twitter.com/GPfNqvITCY
— ANI (@ANI) June 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | BSF jawan Ct/GD Ranjit Yadav, who sustained bullet injury was evacuated to Jivan Hospital, Kakching where he was declared dead. pic.twitter.com/GPfNqvITCY
— ANI (@ANI) June 6, 2023#UPDATE | BSF jawan Ct/GD Ranjit Yadav, who sustained bullet injury was evacuated to Jivan Hospital, Kakching where he was declared dead. pic.twitter.com/GPfNqvITCY
— ANI (@ANI) June 6, 2023
संशयित कुकी अतिरेक्यांचा हल्ला : याआधी 3 जून रोजी रात्री बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या संशयित कुकी अतिरेक्यांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील दोन गावांवर हल्ला केल्याने किमान 15 लोक जखमी झाले होते. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, फयेंग आणि कांगचुप चिंगखॉंग गावात तैनात राज्य पोलीस आणि मणिपूर रायफल्सच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंमधील चकमक झाली, जी चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. अतिरेकी जवळच्या टेकड्यांकडे पळून गेले होते.
मणिपूरमध्ये महिनाभरापासून हिंसाचार : मणिपूरमध्ये जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचाराने राज्याला जातीय आधारावर विभागले आहे. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 100 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. टेकड्यांवर राहणाऱ्या कुकी आदिवासींना स्वतंत्र राज्य हाच एकमेव उपाय आहे असे वाटते, तर खोऱ्यातील प्रभावशाली मीतीस, जे अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत, ते राज्याच्या कोणत्याही विभाजनाच्या किंवा वेगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत.
मोठ्या प्रमाणात विस्थापन: 3 मे पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारामुळे डोंगर आणि खोऱ्यातील लोक मोठ्या प्रमाणात विस्थापित झाले आहेत. टेकड्यांवर राहणारे गैर-आदिवासी मीते खोऱ्यात पळून गेले आहेत आणि खोऱ्यात राहणारे आदिवासी कुकी टेकड्यांवर स्थलांतरित झाले आहेत, यावरून दोन समुदाय आणि भिन्न भौगोलिक स्थानांमधील विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे मतभेद होत आहेत आणि ते वाढत आहेत.