जम्मू : सीमेपलिकडून भारतात अमली पदार्थाची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्करी जवानांनी हाणून पाडला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करी करणाऱ्या पाकिस्तानच्या तस्कराला सांबा सीमेवर गोळ्या घालून ठार करण्यात यश मिळवल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली आहे. मारल्या गेलेल्या तस्कराच्या ताब्यातून चार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहितीही या प्रवक्त्याने दिली आहे.
रामगढ सीमा भागातून अमली पदार्थाची तस्करी : भारत पाकिस्तान सीमेवरील रामगड सीमा परिसरात दहशतवादी अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले होते. यावेळी जवांनानी या पाकिस्तानी तस्कराला सूचना देत थांबण्याचे आदेश दिले. मात्र पाकिस्तानी तस्कराने लष्करी जवानांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन सीमेपार घुसखोरी सुरुच ठेवल्याने जवानांनी या तस्करावर गोळीबार केला. भारतीय लष्करी जवानांनी गोळीबार करत या पाकिस्तानी तस्कराला यमसदनी धाडण्यात यश मिळवले.
-
On the intervening night of 24/25 July, the vigilant BSF troops neutralised a Pak smuggler while he was trying to smuggle Narcotics through the Ramgarh border area. Four packets of suspected Narcotics (weighing approx 4 kgs) were found along with the body of the Pak smuggler.… pic.twitter.com/Ps40nvoJYC
— ANI (@ANI) July 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On the intervening night of 24/25 July, the vigilant BSF troops neutralised a Pak smuggler while he was trying to smuggle Narcotics through the Ramgarh border area. Four packets of suspected Narcotics (weighing approx 4 kgs) were found along with the body of the Pak smuggler.… pic.twitter.com/Ps40nvoJYC
— ANI (@ANI) July 25, 2023On the intervening night of 24/25 July, the vigilant BSF troops neutralised a Pak smuggler while he was trying to smuggle Narcotics through the Ramgarh border area. Four packets of suspected Narcotics (weighing approx 4 kgs) were found along with the body of the Pak smuggler.… pic.twitter.com/Ps40nvoJYC
— ANI (@ANI) July 25, 2023
पाकिस्तानी तस्कराजवळ आढळले 4 पाकिटे : भारतीय लष्करी दलाच्या जवानांनी ठार केलेल्या पाकिस्तानी तस्कराजवळ प्रत्येकी एक किलो वजनाचे अमली पदार्थाचे चार पाकिटे आढळून आली आहेत. या परिसरात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून झाडाझडती घेतली जात आहे. हा पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कर कोणाला ही अमली पदार्थ देणार होता, याचा शोध घेण्यात येत आहे.
-
BSF foils narco smuggling bid in Jammu, kills Pak smuggler
— ANI Digital (@ani_digital) July 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/UaIk8aWTUU#BSF #Smuggling #JK pic.twitter.com/wczt2uEIxy
">BSF foils narco smuggling bid in Jammu, kills Pak smuggler
— ANI Digital (@ani_digital) July 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/UaIk8aWTUU#BSF #Smuggling #JK pic.twitter.com/wczt2uEIxyBSF foils narco smuggling bid in Jammu, kills Pak smuggler
— ANI Digital (@ani_digital) July 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/UaIk8aWTUU#BSF #Smuggling #JK pic.twitter.com/wczt2uEIxy
एसएम पुरा पोस्टजवळ संशयास्पद हालचाल : सोमवारी मध्यरात्री रामगड सेक्टरमधील एसएमपुरा पोस्टजवळ संशयित दहशतवाद्याची हालचाल भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना दिसून आली होती. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयित घुसखोराला वारंवार सूचना देऊनही त्याने आपली हालचाल सुरुच ठेवल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कराला ठार करण्यात यश आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. या पाकिस्तानी लष्कराची अद्यापही ओळख पटली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -