अहमदाबाद - बीआरटी बसने स्वतंत्र मार्गिका तोडून अकबरनगर पुलाच्या भिंतीला धडक झाल्याने शहरात अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे दोन भागात तुकडे झाले आहेत.
भररस्त्यात अपघात झाल्याने बघ्यांची पुलावर गर्दी जमा झाली होती. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.


बीआरटीसाठी स्वतंत्र मार्गिका असताना अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.