ETV Bharat / bharat

Zilla Parishad Polls : बीआरएसचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर डोळा, लढविणार जिल्हा परिषद निवडणुका - Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao

7 मे ते 7 जून या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस समित्या स्थापन केल्या जातील आणि तेथे 10 ते 12 लाख लोकांसह एक विशाल किसान रॅली काढण्यात येईल. राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष समित्या स्थापन करतील आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका जेव्हाही होतील तेव्हा लढतील. बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात आतापर्यंत तीन जाहीर सभा घेतल्या आहेत.

Zilla Parishad Polls
बीआरएस स्थापन करतील पक्ष समित्या
author img

By

Published : Apr 28, 2023, 10:46 AM IST

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष समित्या स्थापन करतील आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका जेव्हाही होतील तेव्हा लढतील. के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली. शेजारील राज्यातील काही नेते बीआरएसमध्ये सामील झाल्याचेही त्यांनी म्हटले.

विशाल किसान रॅली काढण्यात येईल : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की, 7 मे ते 7 जून या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस समित्या स्थापन केल्या जातील आणि तेथे 10 ते 12 लाख लोकांसह एक विशाल किसान रॅली काढण्यात येईल. बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात आतापर्यंत तीन जाहीर सभा घेतल्या आहेत.

कायमस्वरूपी कार्यालये सुरू करण्याचा पक्षाचा विचार : बीआरएस जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्ष घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीला अभिवादन करेल, असे रिलीझमध्ये म्हटले आहे. नागपूर आणि औरंगाबादमध्ये बीआरएसची कायमस्वरूपी कार्यालये सुरू करण्याचा पक्षाचा विचार आहे. भाजपवर निशाणा साधताना दक्षिणेचे क्षत्रप म्हणाले की, लोक त्यांना 'किचिडी' सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करण्यास सांगत आहेत.

देशाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे : तेलंगणा वगळता महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्याला पाणी आणि विजेची समस्या भेडसावत असल्याचा दावा त्यांनी केला. भारतात पिण्याचे पाणी, सिंचन, औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी मुबलक जलस्रोत असले तरी देशाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप त्यांनी केला. भारत राष्ट्र समिती 'भारत परिवर्तन मिशन' म्हणून काम करेल, असे त्यांनी नमूद केले. तेलंगणात त्यांच्या सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची यादी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत असतानाही राज्यात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. तेलंगणा सरकार रायथू बंधू योजनेअंतर्गत पीक गुंतवणूक सहाय्य म्हणून प्रति एकर 10,000 रुपये देत आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : Maharashtra APMC Election updates : राज्यात 47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका; .'या' जिल्ह्यात निवडणुकीच्या धुराळ्यात भाजपा-शिंदे गट आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.