ETV Bharat / bharat

K Kavita In Delhi Liquor Scam : के कविता यांना चौकशीसाठी हजरा राहावे लागणार, अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

दिल्ली दारू धोरण घोटाळ्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी काढलेल्या उद्याच्या समन्सला स्थगिती मिळावी यासाठी बीआरएस आमदार कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, त्यांना सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. (दि. 24 मार्च)रोजी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

K Kavita In Delhi Liquor Scam
K Kavita
author img

By

Published : Mar 15, 2023, 3:23 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी तपास यंत्रणांच्या चौकशीत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS)आमदार कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळालेला नाही. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात उद्या हजर राहण्यासाठी दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला आहे. बुधवारी कविताच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले की, एक महिला असल्याने कविताची ईडीच्या कार्यालयात नाही तर तिच्या घरात चौकशी केली पाहिजे. ही मागणीही कोर्टाने मान्य केली नाही. त्यामुळे कवीता यांना आता हजर राहावे लागणार आहे.

24 मार्च रोजी करणार असल्याचे कोर्टाने म्हटले : सर्वोच्च न्यायालयात 24 मार्च रोजी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. सुप्रिम कोर्ट या प्रकरणाची थेट सुनावणी करत होते. त्यांच्यासमोरील याचिकेत कविता १२ मार्चला ईडीसमोर हजर झाल्याचं म्हटलं होतं. आणि आता पुन्हा ED ने उद्या म्हणजेच 16 मार्चला समन्स बजावले आहे. ही चौकशी तूर्तास थांबवावी, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, या प्रकरणाची सुनावणी 24 मार्च रोजी करणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

हेही वाचा : World Consumer Protection : मुंबईतून झाली ग्राहक चळवळ सुरू तर पुण्यात पंचायतीची स्थापना; जाणून घ्या ग्राहक संरक्षण दिनाचा इतिहास

लोकांवर दारू व्यापारी आणि विक्रेत्यांना नाहक फायदा दिल्याचा आरोप : उद्या ईडी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून त्यांचे जबाब नोंदवू शकते. दिल्ली दारू घोटाळ्यात कविता यांचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह १२ जणांना अटक केली आहे. या लोकांचा आरोप आहे की 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणामुळे उद्योजकांना अवाजवी फायदा झाला आहे. या लोकांवर दारू व्यापारी आणि विक्रेत्यांना नाहक फायदा दिल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात त्याने लाच घेतली.

हेही वाचा : Rahul Gandhi On Elara : राहुल गांधींचा केंद्रावर नवा हल्ला, म्हणाले सरकारकडून भारताच्या सुरक्षेशी तडजोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.