ETV Bharat / bharat

Brimato: काय सांगता! एकाच झाडाला टोमॅटो अन् वांगी

वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी वांगं आणि टोमॅटोचं कलम करून ब्रिमॅटो ही नवीन जात विकसित केली गेली. एकाच झाडाला वांगी आणि टोमॅटो आलं आहे. तेही भरपूर प्रमाणात. ग्राफ्टिंगचा वापर करुन हे केलं गेलं आहे.

ब्रिमॅटो
Brimato
author img

By

Published : Oct 9, 2021, 2:39 PM IST

नवी दिल्ली - एकाच झाडाला टोमॅटो आणि वांगी आलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी अशी रोपं तयार केली आहेत. जी पाहून तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल. या रोपाला त्यांनी 'ब्रिमॅटो' (Brimato) असे नाव दिलं आहे.

Brimato: An Innovative Technology to produce Brinjal and Tomato in the same plant through Grafting
एकाच झाडाला टोमॅटो अन् वांगी

वांगं आणि टोमॅटोचं कलम करून ब्रिमॅटो ही नवीन जात विकसित केली गेली. 25 ते 30 दिवसांची वांग्याची रोपं आणि 22 ते 25 दिवसांची टोमॅटोची रोपं यांचं ग्राफ्टिंग करण्यात आलं. कलम केलेल्या वनस्पतींचं ग्राफ्टिंग 15 ते 18 दिवसांनी शेतात लावण्यात आलं. यानंतर त्याला खत घालण्यात आले आणि त्याची काळजी घेण्यात आली. 60 ते 70 दिवसांनी एकाचं झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली.

एकाच झाडाला वांगी आणि टोमॅटो आलं आहे. तेही भरपूर प्रमाणात. ग्राफ्टिंगचा वापर करुन हे केलं गेलं आहे.ही गोष्ट नक्कीच विश्वास बसण्यासारखी नाही. मात्र, हे खंर आहे. एकाचं झाडाला दोन भाज्यांचं ग्राफ्टिंग करण्याची पद्धत अगदी अलीकडच्या काळात विकसित करण्यात आली आहे. जेणेकरून एकाच वनस्पतीपासून दोन वेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. आयसीएआर आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेनं यापूर्वी ग्राफ्टिंग पोमॅटो (बटाटा-टोमॅटो) चं एकत्र उत्पादन घेण्यात यश मिळवलं होतं.

हेही वाचा - ड्रग्ज क्रुझ प्रकरण : एनसीबीने 11 जणांना पकडून तिघांना सोडले; समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स चेक व्हावेत; नवाब मलिकांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.