नवी दिल्ली: न्यूयॉर्क टाइम्समध्ये योगदान (Contributed to the New York Times) देणाऱ्या पुरस्कार विजेत्या (Award winners) व्हिडिओ पत्रकाराची युक्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कीवमधील पोलिसांचा हवाला देत असे सांगण्यात येत आहे की पत्रकार ब्रेंट रेनॉड यांची रविवारी राजधानीच्या बाहेर इरपिन येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
"आम्ही इरपिनमधील एक पूल ओलांडला. आम्ही इतर निर्वासितांचे चित्रीकरण करण्यासाठी जात होतो. कोणीतरी आम्हाला दुसऱ्या पुलावर नेण्याची ऑफर दिल्याने आम्ही गाडीत चढलो. आम्ही चौकी ओलांडल्यावर त्यांनी आमच्यावर गोळीबार सुरू केला. माझा मित्र ब्रेंट रेनॉड याला गोळी मारण्यात आली आणि मागे सोडण्यात आले. मी त्याच्या मानेवर गोळी झाडताना पाहिली आणि त्यानंतर आम्ही विभक्त झालो," असे एक दुसरे पत्रकार आणि रेनॉडचा सहकारी पत्रकार एका व्हिडीओमधे असे समाजमाध्यमात सांगताना दिसत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेनॉड हे पीबॉडी आणि ड्यूपॉन्ट पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते होते, जे संघर्ष क्षेत्रांमधून मानवतावादी कथा तयार करण्यासाठी प्रसिद्ध होते. दोन दशकांहून अधिक काळ ते पत्रकार होते. न्यूयॉर्क टाइम्सचे उपव्यवस्थापकीय संपादक क्लिफ लेव्ही यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक वृत्तानुसार, हल्ला झाला तेव्हा त्याने प्रेस कार्ड घातले होते, पण तो सध्या आमच्या सोबत काम करत नव्हता. "युक्रेनमधील अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉडच्या मृत्यूबद्दल न्यूयॉर्क टाइम्सला खूप दुःख झाले आहे. ब्रेंट एक प्रतिभावान छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माता होता, परंतु तो युक्रेनमधे न्यूयॉर्क टाइम्ससाठी असाइनमेंटवर नव्हता," लेव्ही यांनी हे शेअर करत ट्विट केले आहे.