ETV Bharat / bharat

BIG BREAKING NEWS : 15 ऑगस्टनंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Breaking news
Breaking news
author img

By

Published : Aug 11, 2021, 7:54 AM IST

Updated : Aug 11, 2021, 10:29 PM IST

22:28 August 11

सुशांतसिंह राजपूत प्रकरण : सिद्धार्थ पिठानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

मुंबई - सिद्धार्थ पिठानीला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने जामीनासाठीची याचिका फेटाळली आहे. सुशांतसिंह राजपूतशी संबंधित प्रकरणातील आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट होता. सिद्धार्थ पिठानी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तसेच इतरांना पुरवल्याच्या आरोपांत NCB ने अटक केली आहे. 

19:30 August 11

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस? एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या कर्जाची मागितली माहिती

जळगाव -  पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणासंदर्भात ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली असून, एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या संदर्भातील माहिती मागितली आहे. ही नोटीस जिल्हा बँकेला तीन ते चार दिवसांपूर्वी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. या नोटिसीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या संदर्भातील सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचे समजते. याबाबतची माहिती आज समोर आलेली आहे. परंतु, जिल्हा बँकेच्या अधिकृत सूत्रांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आहे किंवा नाही? याची चौकशी ईडी करत असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

19:29 August 11

काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी नागपूरहून हजारो कार्यकर्ते दिल्लीला रवाना

नागपूर - काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी नागपूरहून हजारो कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत. दलित अत्याचाराबद्दल काँग्रेसकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. अ.भा. काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर धरणे देण्यात येणार आहे. देशभर दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात १२ ऑगस्टला दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपुरातून हजारो कार्यकर्ते "जय भीम, जय संविधान" अशा घोषणा देत आज दिल्लीला रवाना झाले.

19:29 August 11

चंद्रभागा नदीत टिपर कोसळला, चालक जागीच ठार

पंढरपूर - पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पुलावर वरून टिपर कोसळून  टिपर चालक जागीच ठार झाला आहे. भुटबरे गावातून पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या टिपर चालकाचा तोल गेल्यामुळे टिपर अहिल्या पुलावरून चंद्रभागा नदीत कोसळला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

18:50 August 11

कोरेगाव भीमा प्रकरण : अॅड सुरेंद्र गडलिंग व कवी वरवरा राव यांच्या जमीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या अॅड सुरेंद्र गडलिंग व कवी वरवरा राव यांच्या जमीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला.

18:50 August 11

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात १ टक्के आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - 2018 मध्ये अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण दिले होते. त्यात तफावत होती.  त्यात आता बदल करण्यात आले आहेत. अ, ब आणि क अशी टक्केवारी करण्यात आली आहे. 2018 मध्ये परीक्षा दिल्या आहेत. त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्याचबरोबर सरकार राज्यात महिला वसतीगृह बांधणार आहे. त्यामध्ये पाच वर्षे राहण्याची सुविधा असेल. तीन वर्षे वसतिगृह आणि दोन वर्ष इतर ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात १ टक्के आरक्षण, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बीड मध्ये सासू सासऱ्यानी नवऱ्याच्या भाव सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडले होते. महिलेने विरोध केल्यामुळे घराबाहेर काढले. हा प्रकार गंभीर आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायद आहेत. महिलांनी घाबरून जाऊ नये.  या प्रकरणाची चौकशी केली जाईल.  ओबीसी आरक्षणाबाबत ठाकूर म्हणाल्या की, आरक्षण मिळायला हव. संविधानाचा हक्क आहे. आम्ही आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

18:39 August 11

हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार, 15 ऑगस्ट नंतर अंमलबजावणी होणार

हॉटेल  आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा, हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत उघडी राहणार, 15 ऑगस्ट नंतर अंमलबजावणी होणार, सूत्रांची माहिती

17:34 August 11

डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा उच्च न्यायालयाकडून मंजूर

नागपूर - डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. गवळीच्या वकीलांनी रजेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

16:05 August 11

भायखळ्यात एका इमारतीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई - भायखळयातील संकिल स्ट्रीट येथे एका उंच इमारतीमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनेबाबत सविस्तर वृत्त आले नाही.  

15:33 August 11

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याला 9 दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव -  बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील देवकीनंदन झंवर याला पुणे न्यायालयाने आज, बुधवारी 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनील झंवर याला काल (11 ऑगस्ट) नाशिकच्या पंचवटी परिसरातून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. पोलीस पथकाने अटकेनंतर त्याला रात्री उशिरा पुण्यात आणले होते. त्यानंतर आज सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. झंवर हा गेल्या 5 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

14:00 August 11

नागपूर - विदर्भवाद्यांचे मुंडण आंदोलन

नागपूर

विदर्भवाद्यांचे नागपूरच्या इतवारीत चंडिका मंदिर परिसरात बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने, सरकार मेले म्हणत शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी मुंडन करून शोक व्यक्त करण्यात आला. मोदी सरकारने वेगळा विदर्भाच्या मागणीकडे गांभीर्य नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच कोरोना काळात वीज बिल माफी न देत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर घेऊन त्याला हार घालण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे मुंडन करून घेतले.

13:06 August 11

कोल्हापूर ब्रेकिंग - कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त आक्रमक

- सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने पूरग्रस्तांना ग्रामपंचायत कार्यालयांना ठोकले टाळे  

- तालुक्‍यातील 53 ग्रामपंचायतींना ठोकले टाळे

- 100% मदत जाहीर करावी पूरग्रस्तांना केली मागणी

- राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

13:04 August 11

मुंबई - भांडुप येथे बेस्ट बसचा अपघात - 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

- 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

- पुंडलिक भगत असे मृताचे नाव

- दोनजण जखमी

- रस्त्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस इलेक्ट्रिक कॅबिनवर जाऊन धडकली

- बस आणि कॅबिनमध्ये चेंगरून एका वृद्धाचा मृत्यू तर दोन जण जखमी

12:14 August 11

महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्तीसाठी छगन भुजबळ कोर्टात

भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात लवकरच सुनावणी

ACB नं बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका, नुकतीच पाच आरोपींची निर्दोष मुक्तता

विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्युडी अभियंत्याचा समावेश

10:30 August 11

यवतमाळ फ्लॅश - महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे हेलिकॉप्टरचा फॅन लागल्याने चालकाचा मृत्यू

यवतमाळ फ्लॅश महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे हेलिकॉप्टरचा फॅन लागल्याने चालकाचा मृत्यू

फुलसांवगी येथील २५ वर्षाच्या एका युवकाने घरीच हेलिकॉप्टर बनवलं. बनवलेल्या हेलिकॉप्टरचं रात्री दरम्यान ट्रायल घेण्यासाठी सुरू केलं असता फॅन तुटून फायलटच्या डोक्याला लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.उपचारादरम्यान चालकचा मृत्यू झाल्याची माहिती महागाव पोलिसांनी दिली.

हेलिकॉप्टर अपघातात ठार झालेल्या फायलटचे नाव शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना, शेख इब्राहीम असे आहे.

10:27 August 11

नाशिक ब्रेकिंग - डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल ऑक्सिजन गळती प्रकरणी ठेकेदार कंपनीला २४ लाखांचा दंड

नाशिक ब्रेकिंग :-

डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल ऑक्सिजन गळती प्रकरणी ठेकेदार कंपनीला २४ लाखांचा दंड

२४ रुग्णांचा वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला होता

10:25 August 11

अमरावती फ्लॅश - विना परवाना जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला

अमरावती फ्लॅश

विना परवाना जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला

२६ जनावरांना जीवदान; जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय

अमरावतीच्या देवगाव नाक्यावर पहाटे पोलिसांची कारवाई

तळेगाव दशासर पोलिसानी केली कारवाई

09:34 August 11

कोवाक्सिन आणि कोविशील्ड मिक्सिंगच्या अभ्यासाला डीसीजीची परवानगी

कोवाक्सिन आणि कोविशील्ड मिक्सिंगवर अभ्यास करण्यासाठी भारतीय औषध नियंत्रक जनरलची (डीसीजी) परवानगी

09:18 August 11

भारतातील किनारपट्टीवरील १२ शहरांना समुद्राच्या पाणीपातळी वाढीचा धोका

नासाने ग्लेशियर वितळण्याच्या प्रमाणावरुन केला अंदाज व्यक्त

या शतकाअखेरपर्यंत क्रमाक्रमाने पाणीापातळीत वाढ होणार

मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम, कोचीसह १२ शहरांचा समावेश

09:16 August 11

औरंगाबाद - पहिल्यांदाच होणार स्मार्टसिटीच्या बजेटचे ऑडिट

औरंगाबाद 

पहिल्यांदाच होणार स्मार्टसिटीच्या बजेटचे ऑडिट

पालिकेचे नागपूर येथील संस्थेला पत्र

आतापर्यंत दोनदा अंतर्गत झाले ऑडिट

स्मार्ट सिटीला मिळणार एक हजार कोटींची निधी

आतापर्यंत जवळपस मिळाले पाचशे कोटी रुपये

08:24 August 11

संसदेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे राज्यसभा विरोधीपक्ष नेत्याचा सदनात आयोजन

राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षांच्या सदनातील नेत्यांची बैठक आज राज्यसभा विरोधी पक्षनेते यांच्या चेंबरमध्ये होणार आहे.

08:21 August 11

तेलंगणात स्थानिक भाजप नेत्याला जाळून मारले, गुन्हा दाखल

तेलंगणा राज्यात मेडक जिल्ह्यातील भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

07:47 August 11

BIG BREAKING NEWS - नाशिकमध्ये २ महिलांना घरात घुसून जाळले

नाशिक ब्रेकिंग:-

- दोन महिलांना घरात घुसून जिवंत जाळले

- नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील धक्कादायक घटना

- जाळलेल्या दोनही महिलांची प्रकृती चिंताजनक

- भारती गौड आणि सुशीला गौड असे जाळण्यात आलेल्या महिलांचे नाव

- जाळण्याचा प्रयत्न करणारा संशयित सुखदेव कुमावत हा रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Aug 11, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.