ETV Bharat / bharat

MH Big BREAKING : राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीला परवानगी नाकारली.. काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी - Nationalist Congress party merged with Trinamool congress

big breaking
big breaking
author img

By

Published : Dec 13, 2021, 3:48 PM IST

Updated : Dec 13, 2021, 8:49 PM IST

20:46 December 13

राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीला परवानगी नाकारली.. काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी

28 डिसेंबर रोजी मुंबईत राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी न दिल्याबद्दल मुंबई काँग्रेसने बीएमसी, मुंबई पोलीस आणि इतरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे.

20:41 December 13

राज्यात ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, रुग्णसंख्या 20 वर

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने आज जारी केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण सापडले आहे. 1 लातूर व 1 रुग्ण पुण्यातील आहे. राज्यात ओमायक्रॉनची 20 केसेस झाल्या आहेत.

20:40 December 13

अनैतिक संबंधच्या संशयातून पत्नीचा शिरच्छेद, तरुणाला अटक

अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून २७ वर्षीय पत्नीचा शिरच्छेद करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाविरुद्ध रायगड जिल्ह्यातील माथेरान पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली आहे.

19:23 December 13

लातूरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

मुंबई, पुणे व नागपूरनंतर आता लातूरमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. दुबईहून परतलेला प्रवाशी लातूरात 'पॉझीटीव्ह' आढळला. पॉझिटीव्ह रुग्ण लातूरच्या औसा येथील रहिवाशी आहे.

19:16 December 13

दोन बॉलिवूड अभिनेत्रींना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांची चाचणी

मुंबई - दोन सिने तारका कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी 15 लोकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यांचा अहवाल उद्या येणार आहे. दोन्ही अभिनेत्री होम क्वारंटाईन आहेत. नागरिकांनी आणि सेलिब्रेटींनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

19:16 December 13

मुंबई विमानतळावर ड्रग्ज सापडल्यानंतर एसीबीची छापेमारी

मुंबई - एनसीबीने मुंबईत चार ठिकाणी छापा मारला. दोन छापे डोंगरी येथे तर अंधेरी व वांद्रे येथेही एनसीबीने छापे मारले. शनिवारी मुंबई विमानतळावर एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने मुंबईत छापेमारी सुरू केली आहे. हे ड्र्ग्ज कुरिअरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येत होते. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

17:45 December 13

एनसीबीची मुंबईत चार ठिकाणी छापेमारी

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने मुंबईत चार ठिकाणी छापे टाकले आहेत. डोंगरी भागात दोन ठिकाणी तर अंधेरी आणि वांद्रे येथे प्रत्येकी एका ठिकाणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. शनिवारी मुंबई विमानतळावर एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, त्यानंतर एनसीबीने ही छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे कुरियर ने ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

17:41 December 13

नागपुरात 19 वर्षीय गायक मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर - शहरात सामूहिक बलात्काराची घटना उघडली आली आहे . १९ वर्षीय गायक तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचं उघड झाले आहे. पीडित गाण्याच्या शिकवणीला जात असताना दोन आरोपींनी तिचे रामदासपेठ परिसरातून अपहरण केले. त्यानंतर कळमना येथे नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) काही झोनचे डीसीपी दाखल.

17:40 December 13

नवाब मलिक प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात पुढील सुनावणी 1 जानेवारीला

वाशिम - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या विरुद्ध जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. न्यायालयाचा संबंधित आदेश घेऊन कुर्ला पोलीस स्टेशनचे कर्मचारी सलग 3 दिवस नवाब मलिक यांच्या बंगल्यावर गेले असता ते घरी नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात पुढील सुनावणी 1 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

16:14 December 13

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण सापडला

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. ऑस्ट्रेलियामधून आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण 5 जण ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आले होते. 4 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात एकूण 432 आलेत त्यापैकी 330 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. 300 जण निगेटिव्ह आहेत तर 30 जणांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत.

16:14 December 13

हिवाळी अधिवेशनात आमदारांशी हवामान बदलाच्या परिस्थितीवर चर्चा करणार - आदित्य ठाकरे

आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही राज्याच्या आमदारांशी हवामान बदलाच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. हवामान बदल हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, असे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

16:13 December 13

मुंबईत अंधेरी येथे लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबईतील अंधेरी (पूर्व) भागात इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी झाल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

16:05 December 13

राजकीय पक्षांनी हवामान बदल हा त्यांचा निवडणूक अजेंडा बनवणे काळाची गरज - आदित्य ठाकरे

आम्ही हरित अभ्यासक्रम शालेय शिक्षण विभागाकडे सोपवत आहोत आणि हरित पृथ्वीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी आशा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. जर हवामानात बदल झाला तर त्याचा परिणाम आपल्या देशातील लोकांवर इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त होईल कारण आपली लोकसंख्या दाट आहे. राजकीय पक्षांनी हवामान बदल हा त्यांचा निवडणूक अजेंडा बनवणे ही काळाची गरज आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

14:54 December 13

Goa Assembly Election : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आमदार चर्चिल आलेमाव यांनी पक्ष केला तृणमूलमध्ये विलीन

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का (Big blow Nationalist Congress Party in Goa)बसला आहे. राज्यातील पक्षाचे नेते आमदार चर्चिल आलेवाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल मध्ये (Nationalist Congress Party merged with Trinamool) विलीन केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील नेत्यांनीच पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये विलीन केला आहे.

Last Updated : Dec 13, 2021, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.