पाटणा Boyfriend Private Parts Cut In Bihar : प्रेयसीच्या एका हाकेला धाऊन जाणारे अनेक प्रियकर सध्या आपल्याला दिसतात. मात्र दरवेळी प्रेयसीचं बोलावणं सुखकारक असेलच, असं नाही. जी फोन करुन बोलवते, ती खतरनाकही असू शकते. त्यामुळे प्रेयसीच्या एका हाकेवर धाऊन जाणाऱ्या काही प्रियकरांसाठी ही धोक्याची घंटा देणारी बातमी आहे. झालं असं, की प्रेयसीच्या कॉलवर तिच्या घरी गेलेल्या प्रियकराचं गुप्तांग प्रेयसीच्या नातेवाईकांनी कापून टाकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील ही घटना वाचल्यावर तमाम प्रियकरांच्या मनात आता प्रेयसीचा कॉल आल्यानंतर धोक्याची पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. या घटनेत गुप्तांग कापलेल्या प्रियकराची हालत मोठी गंभीर झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रियकराचं कापलं गुप्तांग : मुझफ्फरपूरमधील एका तरुणाचं जवळच राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. या प्रेमाची कुणकुण प्रेयसीच्या घरच्यांना लागली होती. त्यामुळे प्रेयसीच्या नातेवाईकांनी तरुणाला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही या दोन्ही प्रेमवीरांवर कोणताच फरक पडला नाही. या तरुणाच्या प्रेयसीनं त्याला फोन करुन घरी बोलावलं होतं. त्यामुळे तो सरैयागंज परिसरात गेला होता. त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला मारहाण करुन त्याचं गुप्तांग कापल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
प्रेयसीनं थाप देऊन बोलावलं घरी : या घटनेतील प्रेयसीनं तरुणाला, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची थाप मारुन घरी बोलावलं होतं. वडिलांना रुग्णालयात दाखल करायचं आहे. त्यामुळे तू लवकर घरी ये, अशी थाप त्याच्या प्रेयसीनं त्याला मारली होती. त्यामुळे हा प्रियकर ताबडतोब तिच्या घरी पोहोचला. तो सरैयागंज परिसरातील प्रेयसीच्या घरी गेल्यानंतर त्याला तिच्या नातेवाईकांनी मारहाण केली. त्याच्याजवळील सोन्याची अंगठी, पैसे सोनसाखळी काढून घेतल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्याला जबर मारहाण करत त्याचं गुप्तांग कापल्याचं त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
प्रियकराची मृत्यूशी झुंज सुरू : या घटनेतील तरुणाला प्रेयसीनं त्याला फोन केला. यावेळी तो जिममध्ये निघाला होता. मात्र प्रेयसीनं बोलावल्यामुळे त्यानं तत्काळ प्रेयसीचं घर गाठलं. यावेळी तिच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणाच्या वडिलांनी केला. त्याला खोलीत डांबून त्याचं गुप्तांग कापलं, असंही त्यांनी तक्रारीत नमूद केलं. त्यामुळे कसातरी जखमी अवस्थेत तरुण तिथून निसटून घरी पळाला. त्यानं वडिलांना सगळी आपबिती कथन केली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
हेही वाचा :