फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश): जिल्ह्यातील कमलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री एका तरुण (25) आणि अल्पवयीन मुलीची (15) यांची हत्या करण्यात Boyfriend and girlfriend murdered in Farrukhabad आली. दोघांचे प्रेमसंबंध होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. farrukhabad double murder
प्रियकर प्रेयसीची शनिवारी रात्री गळा चिरून हत्या करण्यात आली. मुलीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही खळबळजनक घटना पोलीस स्टेशन कमलगंज परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे अनेक दिवसांपासून या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना होती. शनिवारी रात्री ही मुलगी घरातून बेपत्ता झाली. रात्री अडीचच्या सुमारास कुटुंबीयांनी शोध घेऊन तरुणीला तिच्या प्रियकरासह गावाबाहेरील आंब्याच्या बागेत संशयास्पद अवस्थेत पकडले.
कुटुंबीयांनी दोन्ही प्रेमी युगुलांना दुचाकीवरून सात किमी अंतरावर असलेल्या सिंगीरामपूर गावाजवळील खंटा नाल्याजवळ नेले. तिथे झाडी पाण्याने भरलेली होती. नातेवाइकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराची झाडीत गळा चिरून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर तरुणीचा भाऊ नीतू सकाळी सहा वाजता पोलिस ठाणे गाठला. त्यांनी हत्येच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मृताचा भाऊ नीतू याने झाडीत लपलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना, सीओ सिटी प्रदीप सिंग यांनीही घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.