ETV Bharat / bharat

Bomb blast in Kabul: काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट, २० ठार - Russian diplomats killed in explosion

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट झाला. या स्फोटात ठार झालेल्या 20 जणांपैकी दोघे रशियन राजनैतिक अधिकारी होते.

काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट
काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट
author img

By

Published : Sep 5, 2022, 4:43 PM IST

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात सुमारे 20 जण जागीच ठार झाली आहेत. (Kabul is the capital of Afghanistan) त्यामध्ये दोघे रशियन राजनैतिक अधिकारी होते. रशियन मीडिया संस्था रशियन टाइम्सने अफगाण मीडियाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

आत्मघातकी हल्लेखोराला ओळखले - दूतावासाच्या गेटबाहेर हा स्फोट झाला जेथे लोक व्हिसाची वाट पाहत होते. 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. रशियन दूतावासाच्या (Taliban) रक्षकांनी आत्मघातकी हल्लेखोराला ओळखले आणि लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याला गोळ्या घातल्या, असे तालिबानचे म्हणणे आहे.

रशियन दूतावास रक्षकांनी ओळखले - मिररमधील वृत्तानुसार, हा एक आत्मघाती हल्ला होता आणि हल्लेखोराने दूतावासाच्या गेटबाहेर तालिबानी रक्षकांनी गोळी झाडल्यानंतर स्फोट घडवून आणल्याचे समजते. स्थानिक पोलीस विभागाचे प्रमुख, मौलवी साबीर यांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोर लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी, रशियन दूतावास रक्षकांनी ओळखले आणि गोळ्या झाडल्या आहेत.

खामा प्रेसने तालिबान अधिकार्‍यांनी सांगितले- वायव्य अफगाणिस्तानात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 20 लोक ठार झाल्याच्या दोनच दिवसानंतर हा स्फोट झाला आहे. खामा प्रेसने तालिबान अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, हेरात शहरातील गुजरगाह मशिदीवर दुपारी 12:40 वाजता बॉम्बस्फोट झाला.

हेही वाचा - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या अगोदर घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.