ETV Bharat / bharat

Blast In Cement Plant : सिमेंट प्लांटमध्ये मोठी दुर्घटना ; सिलिंडरच्या स्फोटात तीन मजूर ठार, दोन जखमी - Balodabazar

छत्तीसगडच्या बालोदाबाजार हिरमी अल्ट्राटेक सिमेंट प्लांटमध्ये अपघात झाला आहे. येथे सिलिंडरचा स्फोट होऊन तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Blast In Cement Plant
सिमेंट प्लांटमध्ये स्फोट
author img

By

Published : Jul 18, 2023, 7:29 PM IST

बालोदाबाजार (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या बालोदाबाजार येथील हिरमी अल्ट्राटेक सिमेंट प्लांटमध्ये मंगळवारी सायंकाळी सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी मजुरांना रायपूर येथील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जिल्हा प्रशासन आणि सिमेंट प्लांटचे अधिकारी तपासात गुंतले आहेत. प्लांटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची संख्या वाढू शकते.

असा झाला अपघात : हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडला. त्यावेळी कारखान्यात अनेक मजूर उपस्थित होते. सिलिंडरचा स्फोट झाल्याने पाच मजूर जखमी झाले. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर आसपासच्या भागातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मदत बचाव कार्य तीव्र करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे.

सिमेंट प्लांटच्या लाईन दोनमध्ये काम करणारे मजूर येथील स्थानिक ठेकेदारासोबत यांत्रिक काम करत होते. तेथे अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट कसा झाला याचा तपास करून काही वेळानंतर डिटेल्स सांगू. - जितेंद्र तंवर, अधिकारी , अल्ट्राटेक सिमेंट प्लांट हिरमी

अपघातात ठार झालेल्या मजुरांची नावे

  1. लक्षेश गायकवाड, वय 21 वर्षे, रा. कुठारोड
  2. शत्रुहनलाल वर्मा, वय 27, रा. मुडापर
  3. उमेशकुमार वर्मा, वय 26, रा. सरफोंगा

कामगारांकडून निष्काळजीपणाचा आरोप : अल्ट्राटेक सिमेंट प्लांट व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप या प्लांटमध्ये काम करणारे कामगार करत आहेत. या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे. एसएसपी दीपक झा यांनी सिमेंट प्लांटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचे मान्य केले आहे. कामगारांच्या आरोपांवर अद्याप जिल्हा प्रशासन किंवा अल्ट्राटेक सिमेंट प्लांट व्यवस्थापनाने कोणतेही निवेदन दिलेले नाही. या घटनेनंतर कामगार धरण्यावर बसले आहेत. मजुरांनी काम बंद केले असून सर्वजण घरी परतले आहेत. महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

सिमेंट प्लांटमध्ये सातत्याने होत आहेत अपघात : बालोदाबाजारच्या सिमेंट प्लांटमध्ये सातत्याने अपघात होत आहेत. यापूर्वी 7 जुलै रोजी अल्ट्राटेक कुकुर्डीह सिमेंट प्लांटमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला होता. ग्लायडरमध्ये वीज पडल्याने मजुराचा मृत्यू झाला होता. या अपघाताला अवघे अकरा दिवस उलटले असतानाच दुसरी दुर्घटना घडली. आता याप्रकरणी जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते हे पहाणे महत्वाचे आहे.

हेही वाचा :

  1. Solapur Textile Factory Blast: सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात पहाटे भीषण स्फोट; तीन कामगारांचा भाजून मृत्यू
  2. Bhind Cylinder Blast : एलपीजी सिलिंडरच्या स्फोटाने हादरले लग्नघर ; 3 निष्पाप बालकं ठार, 4 जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.