ETV Bharat / bharat

Online Sextortion: तरुणीने व्हिडीओ कॉल करत काढले कपडे, व्हिडीओ झाला रेकॉर्ड.. डिलीट करण्यासाठी घेतले साडे चार लाख - dehradun sextortion news

ऑनलाईन अश्लील व्हिडीओ कॉल करून नंतर ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. असाच एक प्रकार उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये समोर आला आहे. एका तरुणाला तरुणीने कॉल करून कपडे काढत अश्लील चाळे केले. तरुणाने उत्साहाच्या भरात प्रतिसाद दिला. अन् तरुणीने व्हिडीओ रेकॉर्ड करून तरुणाला तब्बल चार लाखांना लुटले आहे. Victim of sextortion, Dehradun man blackmailed

Blackmailing from sextortion with a person from Dehradun Woman trapped this person by doing obscene acts on video call
महिलेने व्हिडीओ कॉलवर केले अश्लील चाळे
author img

By

Published : Jan 12, 2023, 1:13 PM IST

डेहराडून (उत्तराखंड): आजकाल सायबर ठग लोकांकडून लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटॉर्शनद्वारे पैसे उकळत आहेत. डेहराडूनच्या ठाणे नेहरू कॉलनी परिसरात सायबर भामट्यांनी एका व्यक्तीला लैंगिक शोषणाचा शिकार बनवले. आरोपींनी तरुणाला सेक्सटोर्शन करून ब्लॅकमेल करण्याची धमकी देत त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

व्हिडीओ कॉल उचलताच घडलं असं काही: डेहराडूनच्या विवेकानंद कॉलनीत राहणाऱ्या पीडित तरुणाने तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, ६ डिसेंबर रोजी त्याच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. तरुणाने कॉल उचलताच कॉलरने समोरून अश्लिल कृत्य सुरू केले. यानंतर कॉल संपला. दुसऱ्या दिवशी तरुणाला पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख दिल्लीतील प्रीतमपुरा पोलिस स्टेशनचा एसएचओ अशी करून दिली.

अशा प्रकारे केले तरुणाला ब्लॅकमेल: तरुणाला फोन करणाऱ्याने त्याला एका मुलीसोबतचा अश्लील व्हिडिओ मिळाला असल्याचे सांगितले. व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर यूट्यूबचे अधिकारी संदीप यांच्याशी संपर्क साधावा लागेल असे सांगितले. फोन करणाऱ्याने त्याला एक नंबर दिला. व्हिडीओ डिलीट न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी कॉलरने दिली. तरुणाने दिलेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख संदीप अशी सांगितली. तसेच व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैशांची मागणी केली. तरुणाने त्याला पैसे देण्याचे मान्य केले.

थोडे थोडे करून लुटले साडे चार लाखांना : पहिल्यांदा ब्लॅकमेल करणाऱ्याने 22 हजार 500 रुपये मागितले. ते दिल्यानंतर पुन्हा तरुणावर दबाव निर्माण करून एकूण 4 लाख 53 हजार रुपये वर्ग करण्यात आले. पोलिस स्टेशन नेहरू कॉलनी प्रभारी लोकेंद्र बहुगुणा यांनी सांगितले की, तरुणाच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या मोबाईलवर आलेले फोन आणि पैसे पाठवण्यात आलेले बँक अकाउंट तपासले जात आहेत.

सेक्सटॉर्शन हा शब्द कसा तयार झाला: सायबर तज्ञांच्या मते, सेक्सटॉर्शन हा शब्द म्हणजे आभासी सेक्स करून नंतर खंडणी मागण्याच्या प्रकारातून बनला आहे. यामध्ये सायबर ठग बनावट आयडी तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केल्यानंतर अश्लील गोष्टी केल्या जातात. काही वेळाने किंवा दिवसानंतर या गोष्टी व्हिडिओ कॉलवर सुरू होतात. त्यानंतर या रेकॉर्डेड व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केले जाते.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय: वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्याच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न छायाचित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे याला सेक्सटॉर्शन म्हणतात. आता भारतातही त्याची प्रकरणे वाढत आहेत. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात. अनेकांना अचानक व्हिडिओ कॉल येतात. जेव्हा त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल येतो तेव्हा कॉल करणारी मुलगी किंवा महिला अश्लील कृत्य करते. ती ती रेकॉर्ड करते आणि कॉल रिसिव्हरच्या व्हिडिओसह एकत्र करते. यानंतर ब्लॅकमेलिंग केले जाते.

हेही वाचा: तिने कपडे काढताच तो पघळला सावधान व्हिडिओ कॉलवर सेक्स करताना 100 वेळा करा विचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.