ETV Bharat / bharat

KCR Alleges BJP: भाजप तेलंगणात करते आहे आमदारांची खरेदी? केसीआर यांचा गंंभीर आरोप

तेलंगणाचे मुख्यमंत्री (telangana cm) के चंद्रशेखर राव (KCR) यांनी रविवारी आरोप केला आहे की भाजप सत्ताधारी टीआरएसच्या 20 ते 30 आमदारांना खरेदी करण्याचा आणि त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. (bjp trying to buy trs mla).

KCR
केसीआर
author img

By

Published : Oct 30, 2022, 8:10 PM IST

हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री (telangana cm) के चंद्रशेखर राव (KCR) यांनी रविवारी आरोप केला आहे की भाजप सत्ताधारी टीआरएसच्या 20 ते 30 आमदारांना खरेदी करण्याचा आणि त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. (bjp trying to buy trs mla).

आमदारांना 100 कोटींची ऑफर? : पोटनिवडणूक असलेल्या मुनुगोडे राव विभागातील एका मतदान सभेला संबोधित करताना, राव यांनी टीआरएस आमदार प्रकरणाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "दिल्लीतील दलाल आले आणि त्यांनी प्रत्येकी 100 कोटी रुपयांची ऑफर देऊन आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला. भाजपला वाटते की केसीआर जोरात बोलत आहेत. आता त्यांचा राजकीय शेवट आहे. त्यांना 20 ते 30 आमदार विकत घ्यायचे होते आणि सरकार पाडायचे होते, मात्र मातीचे पुत्र असलेल्या आमदारांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. भाजपला तेलंगणात अतिक्रमण करायचे असून जेणेकरून ते त्यांच्या इच्छेनुसार राज्यात खाजगीकरण लागू करू शकतील, असा आरोपही राव यांनी केला आहे.

आमदार खरेदीप्रकरणी तीन जणांना अटक: राव यांचे हे विधान चार टीआरएस आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन जणांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवल्याच्या एका दिवसानंतर आले आहे. राव यांनी जाहीर सभेत चारही आमदारांची परेड काढली होती. पी रोहित रेड्डी यांच्या तक्रारीच्या आधारे TRS आमदारांपैकी एक रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा, नंदा कुमार आणि सिंहयाजी स्वामी यांच्या विरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हेगारी कट, लाच देणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या तरतुदी अंतर्गत 26 ऑक्टोबर रोजी रात्री खटले दाखल करण्यात आले आहेत. एफआयआरच्या प्रतीनुसार, रोहित रेड्डी यांनी आरोप केला आहे की, आरोपींनी त्यांना 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आणि त्या बदल्यात आमदाराला टीआरएस सोडून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.