ETV Bharat / bharat

Nupur Sharma : प्रेषित पैगंबर यांच्यावर टिप्पणी: भाजपमधून नुपूर शर्माचे निलंबन.. नवीन जिंदालचीही हकालपट्टी - भाजपमधून नुपूर शर्माचे निलंबन

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने कठोर कारवाई केली आहे. पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केले आहे. यासोबतच पक्षाने नवीन जिंदाल यांनाही प्राथमिक सदस्यत्वावरूनही निलंबित केले ( Nupur Sharma Naveen Jindal supended ) आहे.

nupur sharma
नुपूर शर्मा
author img

By

Published : Jun 5, 2022, 5:52 PM IST

नवी दिल्ली: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी मोठी कारवाई केली. भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले असून, खासदार नवीन जिंदाल यांची हकालपट्टी केली ( Nupur Sharma Naveen Jindal supended ) आहे. नवीन जिंदाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या टिप्पण्यांनी जातीय सलोखा बिघडवल्याचे पक्षाने म्हटले आहे.

नुपूर शर्मा यांच्यावरील कारवाईपूर्वी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे त्यात म्हटले आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा होती. यासंदर्भातील एक ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुपूर शर्मासोबतच पक्षाने नवीन कुमार जिंदाल यांनाही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत.

  • बीजेपी ने नुपुर शर्मा और नवीन जिंदल को पार्टी की प्राथमिक सदस्यता से निलंबित किया। pic.twitter.com/UZixYEAR9Z

    — ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपच्या शिस्तपालन समितीने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, शर्मा यांनी विविध मुद्द्यांवर पक्षाच्या मताच्या विरुद्ध मत मांडले आहे, जे त्यांच्या घटनेचे स्पष्ट उल्लंघन आहे. "पुढील तपास होईपर्यंत, तुम्हाला याद्वारे पक्षातून आणि पक्षाच्या जबाबदारीतून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे," असे पत्रात म्हटले आहे. दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी जिंदाल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ संपुष्टात आणले जात आहे आणि तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हेही वाचा : दिल्लीतील 'त्या' भाजप प्रवक्त्यावर कारवाईसाठी भिवंडीत स्वाक्षरी मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.