ETV Bharat / bharat

'हेमंत करकरे काही लोकांसाठी असतील देशभक्त', साध्वी प्रज्ञा सिंहांचं वादग्रस्त वक्तव्य - साध्वी प्रज्ञा सिंहांचं हेमंत करकरेंवर विधान

भोपाळजवळील सीहोर येथे भाजपाकडून 25 जूनला आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात आला होता. येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नसल्याचे त्यांनी म्हटलं.

Sadhvi Pragya - Hemant Karkare
साध्वी प्रज्ञा-हेमंत करकरे
author img

By

Published : Jun 26, 2021, 8:50 AM IST

नवी दिल्ली - मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नसल्याचे त्यांनी म्हटलं. भोपाळजवळील सीहोर येथे भाजपाकडून 25 जूनला आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात आला होता. येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. यापूर्वीही त्यांनी आपल्या शापामुळेचे हेमंत करकरे ठार झाल्याचे म्हटलं होते. या विधानानंतर साध्वी आणि भाजपाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्यांनी पुन्हा हेमंत करकरेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या पुन्हा टिकेच्या धनी होऊ शकतात.

  • #WATCH | BJP MP Pragya Thakur says, "An Emergency was imposed in 1975 & an Emergency-like situation had formed in 2008 when Sadhvi Pragya Singh Thakur was jailed in Malegaon blast case...People call Hemant Karkare a patriot, but those who are real patriots don't call him one..." pic.twitter.com/UgplzFd1d7

    — ANI (@ANI) June 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक आणीबाणी 1975 मध्ये लागू करण्यात आली होती. तर दुसरी आणीबाणी परिस्थिती 2000 मध्ये मालेगाव स्फोटात मला तुरूंगात टाकल्यानंतर निर्माण झाली होती. करकरे यांना काही लोक देशभक्त म्हणतात. पण जे खरोखरच देशभक्त आहेत. त्यांना देशभक्त म्हटलं जात नाही. माझी माहिती मिळवण्यासाठी करकरे यांनी मला आठवीत शिकवणाऱ्या आचार्यची बोटे मोडली होती. करकरेंनी मला खोट्या प्रकरणात गोवलं, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. हेमंत करकरे यांच्या संदर्भात साध्वी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केली आहे.

दिवंगत मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी माझ्यावर केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले. त्या दिवशी सुतक सुरू झाले होते. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझे सुतक संपवले, असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच आपल्याच शापामुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे विधान निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये साध्वी यांनी केले होते.

कोण होते हेमंत करकरे?

  • हेमंत करकरे हे मुंबईचे एटीएस प्रमुख होते.
  • 26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
  • सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत 26 नोव्हेंबर 2009 ला त्यांना अशोकचक्र अर्पण केले.

हेमंत करकरे आणि प्रज्ञा यांचे कनेक्शन -

29 सप्टेंबर 2008 च्या रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर, 101 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. NIAच्या अहवालानुसार, या दुचाकीची नोंदणी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी केली आणि या दुचाकीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्याशी असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा - दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझे सुतक संपवले, साध्वी प्रज्ञासिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.