नवी दिल्ली - अंबानी यांच्या अँटिलीया बंगल्याबाहेर कार सापडल्याच्या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्योरोप अधिक तीव्रतेनं होत आहेत. भाजपाने शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी घडविलेल्या षडयंत्रामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप राणे यांनी केला. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्यात राष्ट्रपती राज्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जात आहे. मुकेश अंबानी यांच्यासारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. कायदा व सुव्यवस्थेची कमकुवत परिस्थिती आणि भ्रष्टाचारामुळे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, असे भाजपा खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
सचिन वाझे यांनी रचलेल्या कटात उद्धव ठाकरेच हात आहे. सचिन वाझे यांचे गॉडफादर मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. सचिन वाझेला पूर्वी निलंबित करण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत खात्यात आणले, असे ते म्हणाले.
हेही वाचा - वक्तव्याचा विपर्यास केलायं, मुख्यमंत्री तिरिथसिंह रावत यांच्या पत्नीची सारवासारव