चंदीगड - रोहतकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काही नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसवर हल्ला चढवत भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी शनिवारी हरियाणाचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांना कोणी लक्ष्य केले तर त्यांचे डोळे काढू, अशी धमकी दिली. रोहतकच्या किलोई येथील एका मंदिराच्या परिसरात भाजप नेत्यांना रोखल्यानंतर शर्मा यांनी ही टीका केली आहे.
जर त्यांच्याकडे पाहिले तरी डोळा काढला जाई
आंदोलकांना संबोधित करताना भाजप खासदार शर्मा यांनी काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंग हुड्डा आणि त्यांचा मुलगा दीपेंद्र हुडा यांच्यावर हल्लाबोल करत दीपेंद्र हुड्डा यांच्यामुळेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे ग्रोवर यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला आहे. नेते दीपेंद्र हुड्डा यांना इशारा देताना ते म्हणाले की, जर त्यांच्याकडे पाहिले तरी डोळा काढला जाईल आणि जर कोणी हात वर केला तर तो हात कापला जाईल अशी जहरी टीप्पणी त्यांनी केली आहे.
ते चौधरी दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्या सांगण्यावरून आले होते
भाजपचे माजी राज्यमंत्री मनीष ग्रोवर यांना आडवून ठेवण्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. रोहतकमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रोहतकचे खासदार अरविंद शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाचे वर्णन काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी माजी मंत्री मनीष ग्रोवरला अडवून ठेवले ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, जे चौधरी दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्या सांगण्यावरून आले होते असा आरोपही त्यांनी केला आहे.
मंदिरात का गेले
भाजपचे नेते मंदिरात का गेले? वास्तविक, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये पोहोचले होते. यावेळी पंतप्रधानांचे पूजन, मंदिर दर्शन यासह सुमारे 400 कोटी रुपयांच्या पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवमंदिरात याचे थेट प्रक्षेपण होत होते. किलोईच्या प्राचीन शिवमंदिरात लाईव्ह कार्यक्रमादरम्यान माजी राज्यमंत्री तेथे पोहोचले होते.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; रवानगी आर्थर रोड कारागृहात