मुंगेर (बिहार) - बिहारमधील मुंगेरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका भाजप नेत्याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मुंगेर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल दरवाजा परिसरात घडली. ( BJP Leader Commits Suicide After Killing Wife ) ही घटना आज गुरूवार (दि. 16 जुन)रोजी घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्याची पत्नीसह आत्महत्या - माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंगेर सदर रुग्णालयात पाठवले. ही घटना कशामुळे घडली याचे कारण आणखी समोर आले नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेच्या संदर्भात असे सांगितले जाते की, यावेळी होणाऱ्या मुंगेर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप नेते अरुण यादव यांच्या पत्नी महापौरपदाच्या उमेदवार होत्या. ज्यासाठी अरुण यादव सतत परिसरात प्रचारासाठी जात असत.
पोलीसांकडून घटनेच्या तपास सुरू- मिळालेल्या माहितीनुसार, अरुण यादव यांनी त्यांच्या पत्नीला महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाण्यास सांगितले होते. मात्र उन्हामुळे त्यांच्या पत्नीला निवडणूक प्रचाराला जायचे नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अरुण यादव यांनी हे कृत्य केले अशी माहितीही समोर येत आहे.
घरातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त - या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि खोलीतून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. दोघांच्या डोक्यात गोळ्यांच्या खुणा पोलिसांना आढळल्या आहेत. या घटनेमागील कारण अद्याप पोलिसांना समजलेले नाही. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा - Rahul Gandhi: सोमवारपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची राहुल गांधी यांची ED'कडे मागणी