चंदिगड - शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने विजय खेचून आणला आहे. चंदिगड येथील महापौर निवडणुकीत भाजप विरुद्ध आपमध्ये जोरदार रस्सिखेच होती. या लढतीत भाजपच्या अनुप गुप्ता यांनी आपच्या जसबीर सिंह लाडी यांचा पराभव केला आहे. त्यामुळे अनुप गुप्ता चंदिगडचे महापौर बनले आहेत. काँग्रेस आणि अकाली दलाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळेही भाजपचा विजय सुकर झाला.
एका मताच्या फरकाने झाला भाजपचा विजय चंदिगड महापालिकेत एकूण 36 नगरसेवक आहेत. त्यापैकी काँग्रेस आणि अकाली दलाचे नगरसेवक गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे भाजपला 15 मते मिळाली आहेत. तर लाडी यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले आहे. मंगळवारी महापौर पदासाठी चंदिगड महापालिकेत मतदान झाले होते. यात भाजपच्या अनुप गुप्ता यांनी विजय संपादन केला आहे.
अकाली दल, काँग्रेसचे नगरसेवक राहिले गैरहजर चंदिगडच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 6 नगरसेवक गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे अकाली दलाच्याही एका उमेदवाराने मतदानाला दांडी मारली आहे. या निवडणुकीत भाजपच्या खासदार किरण खेर यांनीही मतदान केले आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले.
भाजप आणि आपमध्येच लढत चंदिगड महापालिकेत भाजप आणि आप विरोधातच खरी लढत रंगली. मागच्या निवडणुकीत उपमहापौर असलेले अनुप गुप्ता यांना यावेळी भाजपने महापौर पदासाठी रिंगणात उतरवले होते. तर आपने जसबीर लाडी यांच्याकडे महापौर पदाच्या उमेदवारीची धुरा सोपवली होती. यात अनुप गुप्ता यांनी लाडी यांच्यावर मात केली आहे.
उपमहापौर पदासाठी रंगणार लढत भाजपचे अनुप गुप्ता हे चंदिगडचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. तर उपमहापौर पदासाठी कंवरजित राणा आणि आपकडून तरुणा मेहता यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस आणि अकाली दलाने मात्र महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसचे 6 आणि अकाली दलाच्या एका नगरसेवकाचे मत कमी झाले. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला.
किरण खेरचे मत ठरले निर्णायक भाजप खासदार किरण खेर यांनी महापालिकेत हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजपला 15 मते पडली तर आपला 14 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे एका मताच्या काठावर भाजपला विजय मिळवता आला. त्यातच काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी गैरहजर राहुन निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तर अकाली दलाच्या एका उमेदवाराने निवडणुकीकडे पाठ फिरवली. त्यामुळेही भाजपचा विजय सुकर झाला.
हेही वाचा - Maharashtra karnataka Border Dispute: कर्नाटकने पुन्हा डिवचले, खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये पुन्हा प्रवेशबंदी