ETV Bharat / bharat

संसदेत हजर राहण्यासाठी भाजपच्या खासदारांना व्हीप, 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर आज चर्चेची शक्यता! -

भाजपने सोमवारी सायंकाळी आपल्या सर्व खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासाठी त्रिस्तरीय व्हीप जारी केला आहे. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी भाजपच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहावे लागणार आहे.

संसदेत हजर राहण्यासाठी भाजपकडून पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप, उद्या 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चेची शक्यता!

author img

By

Published : Aug 9, 2021, 7:14 PM IST

Updated : Aug 10, 2021, 6:39 AM IST

नवी दिल्ली : संसदेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर 10 तारखेला (आज) लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

संसदेत हजेरी बंधनकारक

भाजपने सोमवारी सायंकाळी आपल्या सर्व खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासाठी त्रिस्तरीय व्हीप जारी केला आहे. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी भाजपच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सादर केलेले असताना भाजपने हा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, या विधेयकावर 10 तारखेला लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी पटलावर

सामाजिक न्यायमंत्री विरेंद्र कुमार यांनी 127 वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडले. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांची यादी स्वतःच तयार करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण अधिकार आहेत असे म्हणण्यासाठी तसेच देशाची संघराज्य प्रणाली अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने घटनेतील कलम 342अ, कलम 338ब आणि कलम 366 मध्ये सुधारणेची गरज असल्याचे या विधेयकाच्या उद्दीष्टे आणि कारणांमध्ये म्हटल्याचे कुमार यांनी सांगितले.

102 व्या घटनादुरूस्तीतून 338 ब चा समावेश

102 व्या घटनादुरूस्तीच्या माध्यमातून घटनेत 338 ब आणि 342 अ कलमाचा समावेश करण्यात आला होता. यापैकी कलम 338 ब हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची संरचना, अधिकार आणि कर्तव्याशी निगडीत आहे. तर कलम 342 अ हे एखाद्या जातीला एसईबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील राष्ट्रपतींच्या अधिकारांशी निगडीत आहे. कलम 366 नुसार एसईबीसीची व्याख्या करण्यात आलेली आहे.

विरोधकांचा विनाअट पाठिंबा

दरम्यान, सरकारने सादर केलेल्या सुधारणा विधेयकाला विनाअट पाठिंबा देण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. या विधेयकासाठी सर्व विरोधक हे सरकारच्या पाठिशी असल्याचे काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एससीसंदर्भातील विधेयकाला मंजुरी

अनुसूचित जमातींसंदर्भातील घटनादुरूस्ती विधेयकही सोमवारी लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक गेल्या आठवड्यात राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. अनुसूचित जातींच्या घटनात्मक यादीत सुधारणेची मागणी अरूणाचल प्रदेशने केली होती.

हेही वाचा - 127 वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत सादर; मागासवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना पुन्हा मिळणार!

Last Updated : Aug 10, 2021, 6:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.