नवी दिल्ली / कन्नूर ( केरळ ) : भाजप सरकारने दोन भारत निर्माण केले ( Rahul Gandhi Two India ) आहेत. एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरीबांसाठी. अब्जावधींच्या कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये मोदी सरकारने कर लावला नाही. तर दुसरीकडे लाखो गरीब मुलांना आता त्यांच्या पोषण आहारासाठी आधार आयडी अत्यावश्यक करण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी गुरुवारी दिल्लीत ( Rahul Gandhi Criticized BJP ) केली. राहुल गांधी शुक्रवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ, वायनाडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले ( Rahul Gandhi Wayanad Tour ) आहेत.
राहुल गांधींनी केले ट्विट : "दोन भारत: श्रीमंत मित्रांसाठी कर सवलत आणि कर्जमाफीच्या माध्यमातून हजारो कोटी देण्यात आले. दुसरीकडे गरीब मुलांना अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक आहार मिळण्यासाठी आधार आवश्यक करण्यात आले आहे," असे गांधी ट्विटरवर म्हणाले. देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढल्याने काँग्रेस मोदी सरकारवर टीका करत आहे.
-
Two Indias:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rich ‘mitron’ spoon-fed thousands of crores through tax exemptions & loan waivers.
Poor children need Aadhaar to get nutritious meals at Anganwadis. pic.twitter.com/SMzd3ETqbM
">Two Indias:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2022
Rich ‘mitron’ spoon-fed thousands of crores through tax exemptions & loan waivers.
Poor children need Aadhaar to get nutritious meals at Anganwadis. pic.twitter.com/SMzd3ETqbMTwo Indias:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2022
Rich ‘mitron’ spoon-fed thousands of crores through tax exemptions & loan waivers.
Poor children need Aadhaar to get nutritious meals at Anganwadis. pic.twitter.com/SMzd3ETqbM
राहुल गांधी केरळ दौऱ्यावर : काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ, वायनाडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले असून, त्यादरम्यान ते शेतकरी बँकेच्या इमारतीचे उद्घाटन आणि UDF बहुजन संगम यासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तिरुअनंतपुरममधील सत्ताधारी सीपीआय(एम) चे मुख्यालय असलेल्या AKG केंद्रावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे राज्यात तणाव असताना गांधींच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सत्ताधारी डाव्या पक्षाने केंद्रावरील "बॉम्बहल्ला" मागे काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोप केला आहे.
तोडफोडीनंतर एकाच आठवड्यात दौरा : राज्य पक्षाचे प्रमुख के सुधाकरन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांधींचे स्वागत केले. त्यांचे विमान सकाळी 8.30 वाजता तेथे उतरले. सत्ताधारी CPI(M) च्या विद्यार्थी शाखा SFI च्या कार्यकर्त्यांनी वायनाडमधील कलपेट्टा येथील राहूल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या एका आठवड्यानंतर गांधी यांनी मतदारसंघाचा दौरा केला आहे. ते रविवारी कोझिकोडहून दिल्लीला परततील. गेल्या आठवड्यात कल्पेट्टा येथील गांधींच्या कार्यालयाविरुद्ध एसएफआयचा निषेध मोर्चा होता. जंगलांभोवती इको-सेन्सिटिव्ह झोनच्या मुद्द्यावर निष्क्रिय असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांच्या एका गटाने गांधींच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याने त्याला हिंसक वळण लागले.
हेही वाचा : National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?, वाचा सविस्तर