ETV Bharat / bharat

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा - जे. पी नड्डा यांना कोरोनाची लागण

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवरून दिली. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

जे. पी नड्डा
जे. पी नड्डा
author img

By

Published : Dec 13, 2020, 6:50 PM IST

Updated : Dec 13, 2020, 7:15 PM IST

नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवरून दिली. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे ते म्हणाले. संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी आणि विलगीकरणात राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या बांधणीसाठी नड्डा यांनी नुकताच विविध राज्यांचा दौरा केला होता. तीन दिवसांपूर्वी ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरून आले आहेत. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल राज्याचा केला दौरा

कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने ६० वर्षीय नड्डा यांनी चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते घरी विलगीकरणात राहत आहेत. नड्डा यांनी नुकतात उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल राज्याचा दौरा केला आहे. बंगाल दौऱ्यात त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. मात्र, गाडीला बुलेटप्रूफ काचा असल्याने ते थोडक्यात बचावले होते.

लवकर बरे होण्यासाठी भाजपा नेत्यांच्या शुभेच्छा

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक भाजपा नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'सर, लवकर बरे व्हा', असे ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माननीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी लवकर बरे व्हा. तुमच्या स्वागतासाठी महाराष्ट्र वाट पाहत आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

'या' नेत्यांनाही झाला होता कोरोना

भारतात जवळजवळ 90 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून अनेक नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते पूर्णत: बरे झाले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मनीपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनाही नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

याशिवाय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पेट्रोलिम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना झाला होता. तसेच अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली होती.

Last Updated : Dec 13, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.