नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मोडमध्ये आला असून त्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या केंद्र नेतृत्त्वाने भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. ही बैठक 11 जून रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि बीएल संतोषसह राज्य संघटना सचिव उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्त्यांना दिला मंत्र : दरम्यान बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत खास 'टिफिन मीटिंग' घेतली. कार्यकर्त्यांना मैदानाशी जोडलेले राहून लोकांची मने जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याच्या सूचना दिल्या. भाजपच्या एका सूत्राने सांगितले की, टिफिन बैठकीत भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी पक्षाच्या नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा मंत्र दिला. जमिनीशी जोडले गेले पाहिजे. तसेच लोकांची मने जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील.यावेळी जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना स्वयंशिस्त आणि एकमेकांशी एकरूप राहण्याचे आवाहन केले.
एकरूप राहण्याचे आवाहन : पक्षाच्या सूत्रानुसार, भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना सांगितले की,आपल्या सर्वांनी अहंकार सोडण्यासाठी शिस्तीची गरज आहे. तुमच्या जबाबदारीची खात्री बाळगा. धीर सोडू नका. इतरांना दाखवण्याचे काम बंद करा आणि एकमेकांशी एकरूप व्हा. विरोधकांनी शेतकरी प्रश्न, बेटी बाचओचा मुद्दा किंवा इतर सामाजिक प्रश्न यांसारख्या कोणत्याही ज्वलंत मुद्द्यावर प्रश्न केला तरप्रत्येकाने हे प्रश्न विनम्रपणे हाताळावेत.भाजप सदैव समाजाच्या पाठीशी आहे, याची खात्री लोकांना दिली पाहिजे. पक्ष समाजहितासाठी काम करतो. कधीही कोणावरही आक्रमक होऊ नका, अशी सूचना नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिली.
नवीन लोकांशी संपर्क साधा : आपले स्थानाचे म्हणजेच पदाचे सन्मानाने राखले पाहिजे. जनकल्याणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण केवळ भारतातील सर्वात मोठा पक्ष नाही तर जगातील सर्वात मोठा पक्षही आहोत. आपण चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा मोठे आहोत, त्यामुळे आपण एकजूट राहून आपले स्थान सन्मानाने राखले पाहिजे. आपल्याला नेहमीच लोकहिताचे काम करायचे असते. आपण दररोज नवीन लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी सल्लाही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा -