हैदराबाद - तेलंगणाच्या हणमकोंडा येथे रविवारी परकळा येथील टीआरएसचे आमदार सी. धर्मा रेड्डी यांच्या घरावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजपाच्या 53 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रेड्डी यांच्या घरावर केला होता हल्ला -
रेड्डी यांनी श्री रामजन्म भूमी ट्रस्टच्या सदस्यांनी घेतलेल्या देणगीबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध करत भाजपाने रेड्डी यांच्या निवासस्थानी निर्देशने केली. यावेळी सौम्य तणावदेखील निर्माण झाला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक आणि अंडी त्यांच्या घरावर फेकली. यावेळी त्यांच्या घराच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भाजपकार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि मंत्री केटीआर यांनी आमदार धरम रेड्डी यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीमध्ये अशा हल्ल्यांना स्थान नाही. टीआरएस हा स्वतंत्र राज्य चळवळीचे नेतृत्त्व करणारा पक्ष आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी भाजप नेतृत्त्वाला दिला आहे.
हेही वाचा - Budget 2021 : नेमका कसा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थतज्ज्ञांकडून