शिर्डी : आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांना भाजपाच्या तपास यंत्रणांनी अटक केलेली आहे. जर त्यांनी भाजपात जाण्यासाठी होकार दिला तर, त्यांच्या विरोधातील सर्व कारवाया बंद करण्यात येतील. त्यांना तुरूंगातून मुक्त केले जाईल. देश नेमका कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न भाजप करतय, असा सवाल आम आदमी राघव चड्डा यांनी शिर्डीत माध्यमांसमोर उपस्थीत केला. यापुर्वी काँग्रेसचे हेमंत मिश्रा, तृणमुलचे मुकूंद रॉय, बंगालचे सुवेंदु अधिकारी यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले. चौकशा कारवाया झाल्या. मात्र, त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सगळ्या चौकशा थांबवण्यात आल्या. हा भाजपाचा हा इतिहास आहे असा, आरोप ही खासदार चड्डा यांनी केला.
भाजपा विरोधकांना टार्गेट करतय : राघव चड्डा यांनी आज साईदरबारी हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी देश सध्या कठीण, आव्हानात्मक काळातुन जात असल्याचा आरोप केला. भाजपा विरोधी पक्षांना विशेषत: आम आदमी पार्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. यासाठी साईबाबांच्या चरणी आज सत्यमेव जयतेसाठी प्रार्थना केली. शेवटी सत्याचा विजय होवो. इमानदार व्यक्तींना खाली ओढण्यासाठी, दाबुन टाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशा असुरी, दानवी शक्तींंचे प्रयत्न अयशस्वी होवो. शेवटी सत्य, इमानदारीचा विजय होवो यासाठी बाबांना साकडे घातल्याचे चड्डा यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना बरबाद करण्यासाठी कारवाई : भाजपाच्या अधिपत्याखालील ज्या तपास यंत्रणा आहेत. त्या सर्वांना आपवर सोडण्यात आले आहे. मनिष सिसोदिया, जैन आत आहेत. आम्हाला कुणालाही अटक होवू शकते. मात्र, आमच्यात काहीतरी विशेष गोष्ट आहे, की प्रयत्न करूनही आमचे अस्थित्व संपत नाही. या सगळ्याचा उद्देश अरविंद केजरीवाल यांना बरबाद करण्यासाठीच आहे. त्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जनतेच्या प्रेमाची ताकद आमच्या पाठीशी आहे. असा दावा चड्डा यांनी केला. सगळ्या तपासण्या केल्या, धाडी टाकल्या, मात्र, एकही पुरावा मिळाला नाही. सगळे खोटे आरोप करण्यात येत आहेत, असा आरोपही खासदार चड्डा यांनी भाजपावर केला. साईबाबांच्या चरणाशी वारंवार येतो, इथे मस्तक टेकवले की, पुढच्या लढाईसाठी येथून नवी शक्ती, प्रेरणा मिळते असेही चड्डा म्हणाले.
हेही वाचा - Uddhav Thackeray Support Kapil Sibal : लोकशाही वाचवण्यासाठी कपिल सिब्बल रिंगणात; उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा