ETV Bharat / bharat

Cyclone Biparjoy updates: बिपरजॉय बनले धोकादायक, गुजरातच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस; मुंबईतील जोरदार वादळामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम - मुंबईच्या उड्डाणांवर परिणाम

हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार, पूर्व मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. याबाबत इशारा देण्यात आला आहे. गेल्या 6 तासात ते 05 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत होते पण आता मार्ग बदलला आहे. सौराष्ट्र आणि कच्छसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Cyclone Biparjoy updates
मुंबईतील जोरदार वादळामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम
author img

By

Published : Jun 12, 2023, 2:12 PM IST

नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. आता ते हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. याआधी चक्रीवादळाने पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल केल्याची चर्चा होती, मात्र आता त्याने आपला मार्ग बदलला आहे. त्याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसू लागला आहे.

15 जूनपर्यंत गुजरातमध्ये पोहचणार : भारतीय हवामान खात्याने बिपरजॉय चक्रीवादळाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकू लागले आहे. याआधी चक्रीवादळाने पास्किस्तानच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा होती. परंतु चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे. याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसत आहे. हवामान विभागानुसार, 15 जूनपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहचणार आहे. दरम्यान सौराष्ट्र, कच्छसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर 16 जूनपर्यंत राजस्थानच्या अनेक भागात वादळा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या किनारपट्टी भागात वादळी वारे सुरू : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम मुंबईच्या किनारपट्टीवर दिसून आला आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या पश्चिमेला सुमारे 540 किमी अंतरावर होते. रविवारपासून मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. आज सोमवारी ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा सुरू असून यामुळे विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला आहे. विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

  • Indian Meteorological Department (IMD) issues orange alert for Saurashtra & Kutch Coasts in view of extremely Severe Cyclonic Storm “Biparjoy” over east-central and adjoining northeast Arabian Sea: IMD

    (Pic source: IMD) pic.twitter.com/4W3cKU0Abb

    — ANI (@ANI) June 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोठून किती दूर: पोरबंदरपासून सुमारे 340 किमी नैऋत्य, देवभूमी द्वारकेपासून 380 किमी नैऋत्येस, जखाऊ बंदरपासून 460 किमी दक्षिणेस, 470 किमी दक्षिण-दक्षिण आणि 470 किमी दक्षिण-नैऋत्येस नाल्यापासून कराचीपर्यंत पुढे सरकत आहे. 14 जूनच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर उत्तर-ईशान्य दिशेने जाणार आहे. मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) येथे हे चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

विनाशकारी वेग: चक्रीवादळ बिपरजॉय अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर वादळाच्या हालचालींचा वेग लक्षणीयरित्या वाढत आहे. हे वादळ कच्छ आणि जौखच्या दिशेने सरकत आहे. हवामान खात्याच्या बुलेटिननुसार चक्रीवादळ 14 तारखेपर्यंत उत्तरेकडे सरकू शकते. हे चक्रीवादळ 15 जून रोजी कच्छला धडकू शकते. दरम्यान 125-135 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह 150 किमी प्रतितास वेगाने येणारे चक्रीवादळ विनाशकारी ठरू शकते.

हेही वाचा -

  1. Cyclonic Storm Biporjoy : बिपरजॉय चक्रीवादळ सरकले पूर्वेकडे, गुजरातला पावसाचा दणका तर पाकिस्तानात रेड अलर्ट
  2. Monsson update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास, मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.