बेंगळुरू: भूमिगत मेट्रो बांधकामाशी संबंधित सुरू असलेल्या कामाच्या दरम्यान बेंगळुरूमधील अशोक नगर येथे रस्त्याचा एक भाग खचला. यावेळी रस्त्याच्या मधोमध अचानक एक मोठा खड्डा दिसला. ही घटना जॉन्सन मार्केट रोडवर घडली आहे. यात एक दुचाकीस्वार सिंकहोलमध्ये पडून जखमी झाला आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा : शहरातील वाहनधारक नेहमीप्रमाणे प्रवास करत होते. त्यावेळी जॉन्सन मार्केट रोडच्या मधोमध अचानक एक वर्तुळाकार सिंकहोल उघडल्या गेले. त्यावेळी खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. दुचाकीस्वाराला पुढील उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोकनगर वाहतूक स्थानकांतर्गत असलेल्या जॉन्सन मार्केट रोडवर आज अचानक दोन फूट खोल खड्डा पडला असून या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. ब्रिगेड रोडवरील मेट्रो लाईनजवळ ही घटना घडली.
बोगद्यात मेट्रोचे काम सुरू : घटनेची माहिती मिळताच पूर्व विभागाचे डीसीपी कला कृष्णमूर्ती घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. अचानक रस्ता खचल्याने आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली असून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी मार्ग बदलला आहे. आडुगोडी ते शिवाजीनगरला जोडणारा हा रस्ता आहे. बोगद्यात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध माती सैल झाल्याचे बोलले जात आहे. सध्या वाहतूक पोलिसांनी रस्त्याचे दोन भाग अडवले आहेत.
बांधकाम सुरू असलेला मेट्रोचा खांब कोसळला : शहरातील आणखी एका घटनेत, बेंगळुरूमध्ये बांधकाम सुरू असलेला मेट्रोचा खांब मंगळवारी पहाटे कोसळला. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तेजस्विनी (28) आणि तिचा मुलगा विहान (2.5) यांचा मृत्यू झाला तर मृत तेजस्विनीचा पती लोहित कुमार आणि मुलगी गंभीर जखमी झाले. गोविंदपूर पोलीस ठाण्यांतर्गत एचबीआर ले-आऊटजवळ नागवाडा येथे सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा : Accident News : भरधाव कारची सात वाहनांना धडक, पाहा थरारक व्हिडिओ