पाटणा : बिहारच्या नालंदा आणि सासाराममध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या घटनेची गंभीरता पाहून डीजीपी आरएस भाटी यांनी आता दोन्ही जिल्ह्यांची कमान आपल्या हाती घेतली आहे. डीजीपींनी सध्या आपल्या टीमसह नालंदामध्ये हजर आहेत. याशिवाय आयुक्त कुमार रवी आणि डीआयजी राकेश कुमार राठी हे देखील हिंसाचाराच्या दिवसापासून बिहारशरीफमध्ये ठाण मांडून आहेत. यासोबतच एटीएसचे एसपी संजय कुमार सिंह यांना नालंदाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
-
अभी स्थिति नियंत्रण में है। हादसे में एक की मृत्यु हुई है, 77 लोगों को गिरफ्तार किया गया है। दोषियों पर कार्रवाई होगी। हम लगातार गश्ती कर रहे हैं। 3 पैरामिलिट्री की कंपनी लगाई गई है। हमारी कोशिश है कि शांति बनी रहे। पुलिस ने समय पर लोगों को बचाया। हम लगातार लोगों से अपील कर रहे… pic.twitter.com/TP9nIQaSek
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अभी स्थिति नियंत्रण में है। हादसे में एक की मृत्यु हुई है, 77 लोगों को गिरफ्तार किया गया है। दोषियों पर कार्रवाई होगी। हम लगातार गश्ती कर रहे हैं। 3 पैरामिलिट्री की कंपनी लगाई गई है। हमारी कोशिश है कि शांति बनी रहे। पुलिस ने समय पर लोगों को बचाया। हम लगातार लोगों से अपील कर रहे… pic.twitter.com/TP9nIQaSek
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2023अभी स्थिति नियंत्रण में है। हादसे में एक की मृत्यु हुई है, 77 लोगों को गिरफ्तार किया गया है। दोषियों पर कार्रवाई होगी। हम लगातार गश्ती कर रहे हैं। 3 पैरामिलिट्री की कंपनी लगाई गई है। हमारी कोशिश है कि शांति बनी रहे। पुलिस ने समय पर लोगों को बचाया। हम लगातार लोगों से अपील कर रहे… pic.twitter.com/TP9nIQaSek
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2023
सासाराममध्ये पुन्हा बॉम्बस्फोट : सासारामच्या मोची टोला येथे पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. स्फोटानंतर एसएसबीचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तेथे फ्लॅग मार्च काढला. एएसआय रामनरेश सिंह यांनी सांगितले की, 'आम्ही ड्युटीवर होतो. मी मोठा आवाज ऐकला. तो बॉम्ब होता की फटाके हे स्पष्ट होऊ शकले नाही. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा घराला धुराने वेढलेले दिसले. तेथे कोणीच दिसत नव्हते'.
-
बिहार: रोहता के ससासाराम में एक फिर एक बम धमाके की खबर सामने आई।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
स्टेशन हाउस ऑफिसर संतोष कुमार ने बताया, "हमें लोगों द्वारा बताया गया कि किसी चीज़ की आवाज़ आई है। घटना स्थल पर पहुंचने पर पता चला कि वहां पटाखा जैसी कुछ आवाज़ आई थी। इसके अतिरिक्त कुछ विशेष बात नहीं है।" pic.twitter.com/bVPd60aJny
">बिहार: रोहता के ससासाराम में एक फिर एक बम धमाके की खबर सामने आई।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2023
स्टेशन हाउस ऑफिसर संतोष कुमार ने बताया, "हमें लोगों द्वारा बताया गया कि किसी चीज़ की आवाज़ आई है। घटना स्थल पर पहुंचने पर पता चला कि वहां पटाखा जैसी कुछ आवाज़ आई थी। इसके अतिरिक्त कुछ विशेष बात नहीं है।" pic.twitter.com/bVPd60aJnyबिहार: रोहता के ससासाराम में एक फिर एक बम धमाके की खबर सामने आई।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2023
स्टेशन हाउस ऑफिसर संतोष कुमार ने बताया, "हमें लोगों द्वारा बताया गया कि किसी चीज़ की आवाज़ आई है। घटना स्थल पर पहुंचने पर पता चला कि वहां पटाखा जैसी कुछ आवाज़ आई थी। इसके अतिरिक्त कुछ विशेष बात नहीं है।" pic.twitter.com/bVPd60aJny
109 जणांना अटक : घटनेबद्दल बोलताना एक स्थानिक तरुण म्हणाला की, 'पहाटे 4:52 वाजता स्फोट झाला. आम्ही बाहेर आलो तेव्हा तेथे काही पोलीस आले होते. काही बूट घालत होते तर काही झोपले होते. त्यांनी देखील स्फोटाचा आवाज ऐकला होता. प्रशासनाने त्यांना झोपायला पाठवले आहे का? त्यांच्या निष्काळजीपणामुळे 4 जण आले आणि बॉम्ब फेकून निघून गेले. यामुळे आम्ही सगळे घाबरलो आहोत'. डीजीपी आरएस भाटी म्हणाले की, 'हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. निमलष्करी दलाच्या नऊ कंपन्या आणि तैनात पोलिसांच्या पथकाला आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बिहारशरीफला पाचारण करण्यात आले आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. दोन्ही जिल्ह्यात एकूण 109 जणांना अटक करण्यात आली आहे.
4 एप्रिलपर्यंत इंटरनेट सेवा बंद : रविवारी नालंदा येथे पोहोचल्यानंतर डीजीपींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे सीजेएमही उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची सर्किट हाऊसमध्ये चौकशी सुरू आहे. नालंदाचे एसपी अशोक मिश्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत 77 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घोडदळ आणि लष्करी पथके शहरात फ्लॅग मार्च करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 4 एप्रिलपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सायंकाळी उशिरा एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने या दोन जिल्ह्यांमधील सर्व शाळा 4 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची भरपाई : बिहार शरीफ प्रशासनाने हिंसाचारात मारले गेलेले गुलशन कुमार यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. गुलशन यांचा पहारपुरा लोकलमध्ये गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गुलशन कुमार यांना ते घरातून बाहेर पडताच गोळी लागली होती. त्यांना उपचारासाठी पाटण्याला पाठवण्यात आले होते, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे.