ETV Bharat / bharat

Haj yatra: हज यात्रेकरूंना दिलासा! खर्चात एक लाख रुपयांची कपात; वयोमर्यादेची अटरी संपुष्टात

author img

By

Published : Nov 13, 2022, 5:34 PM IST

हज यात्रेकरूंना दिलासा देणारी बातमी आहे. हज यात्रा आता एक लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. हज यात्रेकरूंची वयोमर्यादाही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष मोहसिन रझा यांनी दिली आहे.

हज कमिटी ऑफ इंडिया
हज कमिटी ऑफ इंडिया

लखनऊ (उत्तरप्रदेश) - भारतीय हज यात्रेकरूंसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता भारत सरकार हज यात्रेवरील अनावश्यक खर्चात कपात करणार आहे. यामुळे हज यात्रेकरूंना आता या प्रवासात सुमारे एक लाख रुपये कमी खर्च येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंना महागड्या हज यात्रेतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील सर्व राज्यांच्या हज कमिटी आणि हज कमिटी ऑफ इंडियाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अनावश्यक खर्चात कपात - केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली हज समिती आणि भारतीय हज समितीच्या बैठकीत हज यात्रेकरूंच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये भारत सरकारनेही हज यात्रेवरील अनावश्यक खर्चात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या प्रवासात सुमारे एक लाखाची बचत होणार आहे अशी माहिती उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष मोहसिन रझा यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय खासगी संस्था यापुढे प्रवासापूर्वी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेणार नाहीत. हाजींच्या हिताचा निर्णय घेत भारत सरकारने अनावश्यक दीर्घ प्रक्रियेऐवजी हाजींना सुविधा देण्याचेही नियोजन केले आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंना हज समितीच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही असही ते म्हणाले आहेत.

प्रवासासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण - याशिवाय आता हज हाऊसचा वापर गरीब आणि असहाय महिलांच्या उन्नतीसाठीही करता येणार आहे. महिला यात्रेकरूंना हजशी संबंधित सुविधा देण्यासाठी आणि प्रवासासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिलांची एक समिती स्थापन केली जाईल, जी महिला यात्रेकरूंना संपूर्ण प्रवासादरम्यान मदत करेल. उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष मोहसीन रझा यांनी सांगितले की, सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी 65 वर्षे वयोमर्यादा रद्द केली आहे.

एक लाख रुपयांनी स्वस्त - देशभरातून हज यात्रेकरू मोठ्या संख्येने मक्का मदिना येथे जातात. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक हज यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यामुळे भारत सरकार उत्तर प्रदेशचा जास्तीत जास्त कोटा ठरवते. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील हज यात्रेकरूंसाठीही ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण, महागड्या हजच्या तक्रारी अनेकदा हज यात्रेकरूंकडून केल्या जातात. पण, आता हज सुमारे एक लाख रुपयांनी स्वस्त होणार आहे. जी यूपीच्या हज यात्रेकरूंसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही असही ते म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.