ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - काय होणार आज दिवसभरात

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big news and events of 30 december
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Dec 30, 2020, 7:25 AM IST

केंद्र सरकार ४० शेतकरी संघटनांशी चर्चा करणार

आज सरकार कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्च करणार आहे. ही चर्चेची सहावी फेरी असेल. केंद्र सरकारने ४० शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन करत आहेत.

big news and events of 30 december
दिल्लीत शेतकरी आंदोलन

राष्ट्रपती प्रदान करणार डिजिटल इंडिया पुरस्कार २०२०

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज डिजिटल इंडिया पुरस्कार २०२० प्रदान करणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केला जाईल. डिजिटल इंडिया पुरस्कार डिजिटल कारभारातील उल्लेखनीय पुढाकार आणि पद्धतींचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय माहिती केंद्र दर दोन वर्षांनी डिजिटल इंडिया पुरस्कारांचे आयोजन करते.

big news and events of 30 december
राष्ट्पती रामनाथ कोविंद

इस्राईलमध्ये कोरोना लसीकरणाचा चौथा दिवस

इस्राईल देशामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून या लसीकरणाचा आज चौथा दिवस आहे. कोरोना विषाणूला संपवण्यासाठी सज्ज आहोत, असे देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू म्हणाले आहेत.

big news and events of 30 december
कोरोना लसीकरण

युवक कॉंग्रेसचा कृषी कायद्याविरोधात निषेध

मध्य प्रदेशात युवा कॉंग्रेस कृषी कायद्यांचा निषेध करणार आहे. छिंदवाड्यातील केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जिल्ह्यातील सातही विधानसभा मुख्यालयात मशाल रॅली निघणार आहे.

big news and events of 30 december
मध्य प्रदेश काँग्रेस

आजपासून इंदूर-जोधपूर स्पेशल एक्सप्रेस धावणार

इंदूर ते जोधपूरकडे जाणाऱ्या इंदूर-जोधपूर एक्स्प्रेसला रेल्वेने परवानगी दिली आहे. आजपासून इंदूर-जोधपूर स्पेशल एक्सप्रेस सुरू होईल. टाळेबंदीमुळे देशभरातील प्रवासावर मर्यादा आली होती. पण आता हळूहळू रेल्वे मंत्रालय विशेष गाड्या सुरू करत आहेत.

big news and events of 30 december
इंदूर-जोधपूर एक्सप्रेस

एकनाथ खडसे यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्याच्या भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी त्यांना आज मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

big news and events of 30 december
एकनाथ खडसे

नवी मुंबईतील शिक्षकांची आजपासून आरटीपीसीआर चाचणी

१ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज पालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर कोव्हिड चाचणी होणार आहे.

big news and events of 30 december
आरटीपीसीआर चाचणी

कोरेगाव भीमा जयस्तंभाजवळील गावांमध्ये संचारबंदी

कोरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा जयस्तंभाजवळील गावांमध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात येणार आहे. २ जानेवारीपर्यंत जयस्तंभाजवळील गावांमध्ये संचारबंदी असणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच जयस्तंभाजवळ कुठलीही सभा घेण्यास परवानगी नाही. आजूबाजूच्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स लावता येणार नाही.

big news and events of 30 december
कोरेगाव भीमा जयस्तंभ

जनता दरबार उपक्रम

जनता दरबार उपक्रमांतर्गत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख व राज्यमंत्री आदिती तटकरे या सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहतील.

big news and events of 30 december
राजेश टोपे

कपूर कुटुंबीयांसमवेत आलियाचे न्यू इयर सेलिब्रेशन -

अभिनेत्री आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणवीर कपूरच्या कुटूंबीयांसह नवीन वर्ष साजरे करणार आहे. आलिया कपूर कुटूंबीयामध्ये न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सामील झाली आहे. आलिया, रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर हे विमानतळावर एकत्र दिसले होते, त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

big news and events of 30 december
आलिया भाट आणि रनवीर कपूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.