मुंबई: पेटीएमच्या स्टॉकमध्ये घसरण सुरूच आहे. रिझर्व्ह बँकेच्या कठोरतेमुळे (RBI Action On Paytm Bank) सोमवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ७०० रुपयांच्या खाली (Paytm's share price is less than Rs 700) गेली. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचा शेअर बीएसईवर सकाळी 11.30 टक्क्यांनी घसरून 687 रुपयांवर (BIG FALL IN PAYTM SHARE) व्यवहार करत होता. एका वेळी शेअरचा भाव 672.10 रुपयांपर्यंत खाली गेला होता. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी या शेअरचा ₹775.05 होता. म्हणजेच सोमवारी तो 87.20 रुपयांनी घसरला.
पेटीएमची इश्यू किंमत 2,150 रुपये होती आणि सोमवारी सकाळी 10:30 वाजता शेअर 687.50 रुपयांवर व्यवहार करत होता. स्टॉकची लिस्टिंग झाल्यापासून स्टॉकमध्ये घसरण होत आहे. पेटीएम जेव्हा आयपीओ घेऊन आले तेव्हा त्याचे बाजार भांडवल रु. 1.39 कोटी होते, जे आता 48,911 कोटींवर आले आहे. पेमेंट्स बॅंकेने त्यांना नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे. पेटीएमची मूळ कंपनीवन 97 कम्युनिकेशन्सने म्हटले आहे की, या स्थगितीचा पेमेंट्स बँकेच्या कोणत्याही विद्यमान ग्राहकांवर परिणाम होणार नाही. विद्यमान ग्राहक पेटीएम प्लॅटफॉर्मवर व्यवहार सुरू ठेवू शकतात. कंपनीच्या विधानानंतरही गुंतवणूकदारांनी पेटीएमच्या शेअर्सवर विश्वास दाखवला नाही. सेबीने अनेक कंपन्यांना आयपीओ मूल्यांकनासाठी त्यांचे गैर-आर्थिक मेट्रिक्स किंवा की परफॉर्मन्स इंडिकेटर ऑडिट करण्यास सांगितले होते. या अंतर्गत पेटीएमचेही ऑडिट केले जाणार आहे.
हेही वाचा : Aadhaar PAN linkage : 31 मार्चपूर्वी करा आधार पॅन कार्ड लिंक