ETV Bharat / bharat

Haryana Rock slide : हरियाणाच्या भिवानीमध्ये दरड कोसळली, 10 ते 15 जण बेपत्ता - भिवानीमध्ये दरड कोसळली

दादम खाण परिसरात दरड ( Rock slide accident in Bhiwani) कोसळली. या दुर्घटनेत अर्धा डझन वाहनांसह 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. आज सकाळी 8.15 च्या सुमारास डोंगराच्या मोठ्या भागाला अचानक तडे गेले आणि दरड कोसळली. अपघातानंतर प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून ढिगारा हटवून लोकांचा शोध घेतला जात आहे.

दरड
Haryana Rock slide
author img

By

Published : Jan 1, 2022, 2:35 PM IST

भिवानी - हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील दादम खाण परिसरात दरड ( Rock slide accident in Bhiwani) कोसळली. या दुर्घटनेत अर्धा डझन वाहनांसह 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. आज सकाळी 8.15 च्या सुमारास डोंगराच्या मोठ्या भागाला अचानक तडे गेले आणि दरड कोसळली. भिवानी जिल्ह्यातील तोशाम विधानसभा क्षेत्रातील दादम गाव खाणकामासाठी ओळखले जाते.

अपघातानंतर प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून ढिगारा हटवून लोकांचा शोध घेतला जात आहे. तथापि, ढिगाऱ्याखाली दबलेल्या संख्येबाबत कोणतीही स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाकडून सामान्य लोकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात येत आहे.

कृषी मंत्री जेपी दलाल (Agriculture Minister JP Dalal) घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप दरड कोसळण्याचे कारण समजू शकलेले नाही. खाण क्षेत्र दोन्ही बाजूंनी वनक्षेत्राने वेढलेले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून खाणीचे काम बराच काळ बंद ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी प्रदूषण विभागाकडून खाणकामासाठी वीज जोडणी देण्यात आली होती. कारण प्रदूषणामुळे खाणकामावर बराच काळ बंदी होती. त्यामुळे खाणकामाशी संबंधित लोकही विरोध करत होते.

हेही वाचा - Vaishno Devi Bhawan Stampede : वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरीमुळे 12 भाविकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.