ETV Bharat / bharat

Woman Wrote Suicide Note On Hand : हातावर सुसाईड नोट लिहित महिलेने घेतला गळफास, भोपाळमधील घटना - भोपाळमध्ये महिलेची आत्महत्या

"मी विश्वासघातकी नाही... मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करीत आहे... असे हातावर लिहून ठेवत एका महिलेने गळफास लावून घेतला. भोपाळमधील चोल मंदिर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी मात्र तिच्या पतीवर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पती-पत्नीमध्ये चारित्र्यावरून वाद होत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. (Woman commits suicide in Bhopal)

Bhopal Susaied
Bhopal Susaied
author img

By

Published : Jul 15, 2022, 12:48 PM IST

भोपाळ - चोला मंदिर परिसरात राहणाऱ्या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Woman commits suicide in Bhopal) केली. तिच्या डाव्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये तिने कुटुंबाची माफी मागताना स्वत:च्या इच्छेनुसार आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पतीच्या पासपोर्ट साइज फोटोवर 'मी बेवफा नाही' असे लिहिले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Bhopal Susaied
Bhopal Susaied

कुटुंबाच्या अनुपस्थितीत फासावर लटकले - एएसआय गजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, इंदू उर्फ ​​गुडिया साहू (35) ही मूळची गारतगंज, जिल्हा रायसेनची रहिवासी होती. 2019 मध्ये तिचा विवाह शिवनगर फेज-3 चोल मंदिर येथे राहणारे सुभाष साहू यांच्याशी झाला होता. सुभाष संगीत शिक्षक आहेत, तर इंदूही एका शाळेत शिक्षिका होती. गुरुवारी सकाळी सुभाष घराबाहेर पडले होते, तर त्यांचा मेहुणाही बाहेर गेला होता. दरम्यान, इंदूने घरात गळफास लावून घेतला. आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबियांना कळविले. दरम्यान, पतीसह कुटुंबीयही घरी पोहोचले.

दोन्ही कुटुंबात वाद : इंदूच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या माहेरचे नातेवाईक गरटगंजहून भोपाळमधील हमीदिया हॉस्पिटलला पोहोचले. हमीदिया हॉस्पिटलमध्ये दोन कुटुंबात वाद झाला. इंदूचा छळ केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. जावई इंदूला तिच्या माहेरी जाऊ देत नव्हता आणि फोनवर बोलू देत नव्हता. विवाहितेच्या चारित्र्यावर पती संशय घेत असल्याचेही तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे. विवाहितेच्या आत्महत्येच्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

चारित्र्यावरुन वाद व्हायचा : पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे आढळून आले आहे की, “महिलेला मूल होत नव्हते. त्यामुळेच तिला आयव्हीएफ तंत्राने उपचार करून घ्यायचे होते. तिचा पती मात्र उपचार करू देण्यास तयार नव्हता. चारित्र्याच्या संशयावरूनही दोघांमध्येही वाद होत असे. दरम्यान, विवाहितेच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Ivana Trump passes away : डोनाल्ड ट्र्म्प यांच्या माजी पत्नी इव्हाना यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.