ETV Bharat / bharat

Bhaubeej 2023 : भाऊबीजकरिता बहिणीला काय गिफ्ट द्यायचयं? 'हे' आहेत चांगले पर्याय - Bhai Dooj news

दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीजनंतर संपतो. . हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते. भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो.

Bhaubeej 2023
भाऊबीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 10:02 AM IST

हैदराबाद : वर्षभरातील सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. अशी ही आनंददायी, उत्साही, चैतन्य वाढवणारी दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. दिवाळीच्या या चार दिवसांत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी अस म्हटलं जातं.

भाऊबीजेला बहिणीनं भावाचं औक्षण करण्यासाठी पुजेचं ताट तयार करावं. त्यात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी. भावाला औक्षणापुर्वी चौरंगावर किंवा पाटावर पुर्व पश्चिम बसवावं. या चौरंग किंवा पाटावर लाल आसन टाकावं त्यावर तांदळाची आरासही काढू शकता. भावाला चौरंगावर बसवून बहिणीनं सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा. कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्यात. अक्षता म्हणजे औक्षवंत! दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात.

या ओवाळणीमध्ये नेहमीपेक्षा वेगळं काय देता येईल ?

  • तुम्हाला तुमच्या बहिणीला काहीतरी उपयुक्त भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही कोणत्याही चांगल्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सचे किंवा मॉलचे गिफ्ट कार्ड देऊ शकता. त्यामुळे ती तिला हवे तेव्हा तिच्या आवडीची एखादी वस्तू नक्की खरेदी करु शकते.
  • सध्याच्या काळात स्मार्ट वॉच ही अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे. रोजच्या धावपळीत टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण आपली कामे नक्कीच सोपी करु शकतो. विविध कंपन्यांचे स्मार्ट वॉट बजेटमध्ये बसत असल्याने तुम्ही याचा विचार नक्की करु शकता.
  • बहिणीला ब्यूटी पार्लरमध्ये वारंवार जाण्याची आवड असेल तर तुमच्या शहरातील एखाद्या नामवंत पार्लरमध्ये ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी तिला तिथले कूपन घेऊन देऊ शकता. मेकअप आणि ब्यूटी ट्रिटमेंट्स आवडणाऱ्या बहिणीला हे गिफ्ट नक्कीच आवडू शकते.
  • तुमचं बजेट अगदी १५-२० हजार रुपये किंवा त्याच्या जवळपास असेल, तर बहिणीच्या नावे एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करणे हा चांगला पर्याय असू शकतो. तिला भविष्यात एखादा मोठा खर्च करण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो.
  • ब्युटी प्रॉडक्टस हा मुलींना देण्यासाठी एक नक्कीच चांगला पर्याय असू शकतो. त्या वापरत असलेल्या ब्रँडचा अंदाज घेऊन लिपस्टीक, काजळ, लायनर या बेसिक गोष्टी तर तुम्ही नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शकता.
  • डीनर डेट हा बहिणीला गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. अनेकदा बहिण-भाऊ आपापल्या आयुष्यात इतके बिझी असतात की ते एकमेकांसाठी वेळ काढतातच असं नाही. अशावेळी बहिण आणि भाऊ दोघंच एखाद्या छान ठिकाणी फिरायला किंवा डीनरला जाऊ शकतात.
  • पर्स, वॉलेट यांसारख्या गोष्टी मुलींसाठी अतिशय गरजेच्या असतात. सध्या बाजारात ब्रँडेड अशा बऱ्याच छान प्रोफेशनल किंवा कॅज्युअल-पार्टी लूक देणाऱ्या पर्स मिळतात. यातला एखाद्या पर्याय तुम्ही बहिणीसाठी नक्की निवडू शकता.

हेही वाचा :

  1. Diwali Festival 2023: साईंच्या दरबारी आज मोठ्या थाटात होणार लक्ष्मीपूजन; जाणून घ्या कशा-कशाची होणार पूजा
  2. kartik somvati amavasya 2023 : कार्तिक सोमवती अमावस्येला स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व
  3. Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडवा 2023; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.