अहमदाबाद - आदिवासी मुलीसोबत प्रेमप्रकरण केल्यामुळे जमावाने १७ वर्षीय मुस्लीम युवकाला रॉड आणि पाईपने जोरदार मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा खून झाल्याची घटना भरुच, गुजरात येथे घडली. फैज मोहम्मद सुलतान अब्दुल कुरेशी, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
फैजच्या वडील म्हणाले, माझा मुलगा ५ मित्रांसोबत अंकलेश्वरला गेला होता. माझ्या पत्नीने फोन केल्यानंतर फैजने बोरीद्रा येथे येण्यास सांगितले. आम्ही बोरीद्राला पोहोचल्यानंचर फैजला काही लोकांनी मिळून मारहाण केली होती. फैजची प्रकृती अत्यंत खराब होती. आम्ही फैजला रुग्णालयात दाखल केले. फैजच्या बरगड्या आणि यकृताला मोठ्या प्रमाणात इजा झाल्या होत्या. चांगल्या उपचारासाठी फैजला सुरतला नेले. परंतु, त्याचा मृत्यू झाला. मला माहित नाही फैजला मारहाण करताना किती लोक होते. मी सरकारकडे फैजला न्याय मिळवून देण्याची विनंती करतो.
माझ्या मुलाला खूप वाईटप्रकारे मारहाण करण्यात आली. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याप्रकरणात सामिल असलेल्या सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे. मी सरकार आणि पोलिसांकडून फैजला न्याय देण्याची विनंती करते. लोक म्हणत आहेत हिंदू-मुस्लीम धर्मामुळे असे झाले आहे. परंतु, असे काही नाही. माझ्या मुलाने काहीही चुकीचे केलेले नाही. माझा मुलगा अवघ्या १७ वर्षाचा होता. तो काय चुकीचे करू शकतो?, अशी प्रतिक्रिया फैजच्या आईने दिली आहे.
अंकलेश्वर सहाय्यक पोलीस आयुक्त एल. ए झाला यांनी माहिती देताना सांगितले, की २४ जुलैला जमावाने युवकाला मारहाण केली होती. झगडीया तहसील क्षेत्रात ही घटना घडली होती. मारहाण केलेल्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, फरार असलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.