ETV Bharat / bharat

मागवला फोन, मिळाले पारले बिस्किट; ऑनलाइन खरेदीत अजब भानगड - ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ

हरयाणाच्या यमुनानगरमध्ये एका युवकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कोट-कलसियाच्या हरप्रित सिंगने ई-कॉमर्स वेबसाइटवरून 11,000 रुपयांचा एक फोन ऑर्डर केला. मात्र, त्याला फोनच्या जागी बिस्कीट मिळाले आहेत.

हरियाणा
हरियाणा
author img

By

Published : Oct 9, 2020, 12:57 PM IST

चंदीगड - आजकाल ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढली आहे. मात्र, ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर भलतेच काहीतरी मिळाल्याचे प्रकार नवीन नाहीत. हरयाणाच्या यमुनानगरमध्ये एका युवकाची अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कोट-कलसियाच्या हरप्रित सिंगने ई-कॉमर्स वेबसाइटवरून 11,000 रुपयांचा एक फोन ऑर्डर केला. मात्र, त्याला फोनच्या जागी बिस्कीट मिळाले आहेत.

ऑनलाइन फोन ऑर्डर केल्यानंतर दोन दिवसांनी पासर्ल घरी आले. मात्र, जेव्हा पार्सल उघडले तेव्हा मला धक्काच बसला. पार्सलमध्ये फोनच्या जागी बिस्किटचे तीन पॅकेट होते, असे हरप्रित सिंगने सांगितले. त्यानंतर हरप्रितने ई-कॉमर्स वेबसाइटशी संपर्क साधला. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे हरप्रितने तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

तथापि, ऑनलाइन मोबाइल खरेदी केल्यावर मोबाइलऐवजी चक्क साबण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतही समोर आला आहे. उत्तन येथील रहिवासी अमोल भगत यांनी फ्लिपकार्ट या कंपनीद्वारे ऑनलाइन मोबाइल खरेदी केला होता. त्याकरिता ऑनलाइन पैसेही भरले होते. त्यानुसार मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी सचिन गुप्ता नावाच्या डिलिव्हरी मुलाने भगतसाठी पार्सल आणले, परंतु मोबाइलऐवजी चक्क साबण मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. याचा तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.