ETV Bharat / bharat

Coronavirus : लॉकडाऊनमुळे यमुना नदीचे प्रदूषण घटले

लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने बंद आहेत. त्यामुळे दिल्लीत रस्त्यांवर शांतता आहे. त्यामुळेच यमुना नदीचा प्रवाह आता स्वच्छ झाला आहे.

author img

By

Published : Apr 7, 2020, 9:52 AM IST

Coronavirus
लॉकडाऊनमुळे यमुना नदीचे प्रदूषण घटले

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे शहरे ओस पडली आहेत. रस्त्यांवर शांतता आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग असणारी यमुना नदी स्वच्छ झाली आहे. तर यमुना नदीत सध्या काळे पाणी नसून ते आकाशासारखे निळे दिसत आहे.

लॉकडाऊनमुळे यमुना नदीचे प्रदूषण घटले

यमुना नदीत वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याचे चित्र समोर आल्यानंतर, जेव्हा ईटीव्ही भारतची टीम यमुनेच्या काठावर वझीराबाद येथे पोहोचली. त्यावेळी खरोखरच नदी साफ झाल्याचे समोर आले. तेथील मच्छीमारांनीही नदीचे पाणी स्वच्छ झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

यमुना नदीची स्वच्छता कारखाने बंद असल्यामुळे झाली आहे. प्रत्यक्षात, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी दिल्लीतील सुमारे 28 औद्योगिक क्षेत्रातील 10 औद्योगिक कंपन्यांमधील कचरा नदीत टाकला जात होता. यापुर्वी नदीची अवस्था अशी होती की, आपल्याला उभेही राहता येत नव्हते एवढी दुर्गंधी होती. पण आता यमुना नदी स्वच्छ झाली आहे, पर्यावरणवादी मनोज मिश्रा यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.