ETV Bharat / bharat

वर्ल्ड फोटोग्राफी डे विशेष...

आज 19 ऑगस्ट, वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणजेच जागतिक छायाचित्र दिन.... आज प्रत्येकजण दिवसाला एकतरी फोटो काढतोच पण या फोटोंमागचा इतिहास कसा आहे हे आपण कधी जाणून घेतले आहे का?

वर्ल्ड फोटोग्राफी डे
author img

By

Published : Aug 19, 2019, 6:32 AM IST

नवी दिल्ली - दैनंदिन जीवनात आपण आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करत असतो आणि या आवडत्या गोष्टी नाना पद्धतीने आपण जपतो देखील, प्रत्येकदा आपल्या आवडीची कुठलीही गोष्ट करताना एक गोष्ट आता कायमची झाली आहे, ती म्हणजे फोटो काढणे.

आजघडीला प्रत्येकजण दिवसातून एक तरी फोटो काढतोच. उठता, बसता, हसताना, रडताना, खेळताना, पळताना, नाचताना, पडताना अशा तऱ्हे-तऱ्हेच्या गोष्टी करतानाचे क्षण आपण फोटोच्या मार्फत कैद करतो, जपून ठेवतो. किती सोपे झाले आहे आज सगळे पण, आधी हे इतके सोपे नव्हते, एका व्यक्तिच्या मनातील एक भन्नाट कल्पनेमुळे आपल्याला आज स्मार्टफोनच्या माध्यमातून आयुष्यातील क्षण कैद करता येतात. आज 19 ऑगस्ट, वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणजेच जागतिक छायाचित्रण दिन.... हा दिवस प्रत्येक फोटोग्राफरच्या जीवनात त्यांनी खेचलेल्या उत्कृष्ट फोटोंसाठी आहे. कामाच्या चला तर जाणून घेऊया फोटोग्राफी नावाच्या ह्या भन्नाट गोष्टीमागच्या काही महत्त्वाच्या घटना-घडामोडी -

जागतिक छायाचित्रण दिन

या दिवसाला सुमारे पावणे २०० वर्षांचा इतिहास आहे. फ्रान्समध्ये याची सुरुवात झाली असे मानले जाते. साधारणपणे इ.स १८०० च्या सुमारास कॅमेरा ही कल्पना विचारात आणली गेली. फ्रान्सचे वैज्ञानिक लुईस डाग्युरे आणि जोसेफ नायफोर यांनी १८३७ मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण सोपे झाले. ९ जानेवारी १८३९ रोजी फ्रान्सच्या फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेने दगेराटाईप या प्रक्रियेबाबत घोषणा करत दगेराटाईप हे नामकरण केले. त्यानंतर १९ ऑगस्ट १८३७ रोजी फ्रान्स सरकारने याचे पेटंट खरेदी केले आणि १८३९ ला जगभरातील लोकांसाठी ‘free to the world’ अशा घोषणेसह उपलब्ध करुन दिले. म्हणूनच १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिनाच्या रुपात साजरा केला जातो...

खरतर जगातील पहिले छायाचित्र हे जोसेफ नायफोर यांनी सन १८२६ मध्ये हेलिओग्राफी पद्धतीने काढले होते. श्वेत रंगातील धूसरशा अशा पहिल्या चित्राला त्यांनी ‘view from the window at Le Gras’(व्ह्यू फ्रॉम द विंडो एट ले ग्रास) या नावाने प्रसिद्ध केले. त्यानंतरचे पहिले रंगीत छायाचित्र हे सन १८६१ साली थॉमस सटन यांनी काढले यात लाल, हिरवा आणि निळ्या रंगाचे फिल्टर वापरण्यात आले होते. तर, आपल्या आठवणींचे क्षण कैद करण्याच्या या प्रक्रियेला, आधी श्वेत नंतर रंगीत ते आत्ताच्या डिजीटल फोटोग्राफीपर्यंतचा प्रवास करावा लागला. आणि आज आपण हाय डिजीटल टेक्नालॉजीचा वापर करत उत्कृष्ट फोटो काढतो. हा दिवस खरा प्रकाशझोतात आला तो १९ ऑगस्ट २०१० साली. या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एका फोटोग्राफरने या दिवसाबाबत जागरुकता पसरविण्यासाठीचा प्रयत्न केला. त्याने व त्याच्या बरोबरच्या २७० फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन या दिवसाचे आयोजन करत त्यांच्या काही छायाचित्रणांचे ऑनलाईन प्रदर्शन भरवले. याला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जवळपास १०० देशांच्या लोकांनी त्या वेबसाईटवर भेट देत आपला सहभाग नोंदवला आणि यानंतर दरवर्षी 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' हा दिवस विविध थीम ठरवून साजरा केला जाऊ लागला. यावर्षीची थीम आहे वर्ल्ड फोटो डे, आणि याचे मुख्य उद्दीष्ट जगभरात सकारात्मक बदलांना प्रेरणा देणे आहे. तसेच फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून जनजागृती करणे हा आहे.

तर असा हा फोटोग्राफीचा प्रवास... आज यामुळेच आपण हवे तेव्हा, हवे तसे फोटो काढून त्या आठवणी नेहमीसाठी कैद करत असतो... चला तर मग... आजचा हा दिवस आणखी एक छानसा सेल्फी, किंवा ग्रुफ्फी काढून साजरा करुया.....

Intro:Body:

shatali

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.