ETV Bharat / bharat

'अयोध्येत मशिदीच्या उद्घाटनाला जाणार नाही' आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर विरोधक आक्रमक

‘जर मुख्यमंत्री म्हणून मला तुम्ही विचारत असाल तर, मला कोणाच्या श्रद्धेची, धर्माची आणि समाजाची अडचण नाही. मात्र, जर एक योगी म्हणून मी नक्कीच उद्धाटनाला जाणार नाही. एक हिंदू म्हणून श्रद्धा बाळगण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा मला अधिकार आहे’, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

author img

By

Published : Aug 7, 2020, 5:02 PM IST

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

लखनऊ - अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद विवादीत जागेच्या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांसाठी शहरात दुसऱ्या ठिकाणी मशिद बांधण्यासाठी जागा दिली आहे. अयोध्येतील या मशिदीचे उद्घाटन करण्यास जाणार नसल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

गुरुवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. एक हिंदू आणि योगी या नात्याने मशिदीचे उद्घाटन करण्यास जाणार नाही, असे ते म्हणाले. यावर समाजवादी पक्षाने टीका केली आहे. योगी यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी सपा ने केली आहे. या वक्तव्यावर उत्तर प्रदेश काँग्रेसची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या विषयी काही बोलण्यास नकार दिला.

‘जर मुख्यमंत्री म्हणून मला तुम्ही विचारत असाल तर, मला कोणाच्या श्रद्धेची, धर्माची आणि समाजाची अडचण नाही. मात्र, जर एक योगी म्हणून मी नक्कीच उद्धाटनाला जाणार नाही. एक हिंदू म्हणून श्रद्धा बाळगण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा मला अधिकार आहे’, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

‘मी या प्रकरणात वादी किंवा प्रतिवादी नाही. त्यामुळे मला निमंत्रण येणार नाही, आणि मी जाणारही नाही. मला असे कोणतेही निमंत्रण मिळणार नाही, असे योगी म्हणाले. ज्या दिवशी मला ते उद्धाटनाला बोलवतील तेव्हा अनेकांचा धर्मनिरपेक्षवाद धोक्यात येईल. त्यामुळे मी काही लोकांना धोक्यात न आणता माझं काम करत राहील, जेणेकरून सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांना कोणत्याही भेदभावाशिवाय मिळत राहील’.

‘अयोध्या वाद कधीही सुटू नय़े असे काँग्रेसला वाटत होते. राजकीय फायद्यासाठी त्यांना हा वाद सुरु ठेवायचा होता. रोजा आणि इफ्तार पार्टीत डोक्यात टोपी घालन म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही. हे एक नाटक असून लोकांना या मागील सत्य माहित आहे’, असे योगी म्हणाले.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते पवन पांडे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. 'मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या शपथेचे उल्लंघन आहे. योगी सर्व राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फक्त हिंदू समाजाचे मुख्यमंत्री नाहीत. हिंदू आणि मुस्लिम समुदायाची लोकसंख्या कितीही असो, ते सर्वांचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची भाषा प्रतिष्ठेला शोभणारी नाही. त्यांनी जनतेची माफी मागावी, असे पांडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.