हैदराबाद - रचकोंडा भागातील एका महिलेने ईटिव्हीची निर्माती आणि डायरेक्टरच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून लोकांकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
या महिलेचे फेसबुकवर एक फेक अकाउंट आहे, ज्यामध्ये तिने आपले पद ईटिव्हीची निर्माती आणि डायरेक्टर असे लिहले आहे. संस्थेची मानहानी आणि निष्पाप लोकांची फसवणूक करण्याचे आरोप लावण्यात आले आहे.
वाय श्रीलता, असे महिलेचे खरे नाव आहे. तिने नाव बदलून खोट्या नावाने फेसबुक आयडी बनवले होते. फेसबुक वर महिलेचे नाव श्रीदेवी तुम्माला असे आहे. दरम्यान, या प्रकरणी महिलेकडून कोणताही खुलासा आलेला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीलता लोकांशी चर्चा करून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळत होती. तिने अनेकांना चित्रपट आणि टिव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतले आहेत.
ईटिव्ही ही प्रतिष्ठीत रामोजी ग्रुप्सची एक संस्था आहे. जिथे चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रम निर्मिती संबंधीत कामे होतात.