हैदराबाद - लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. काहीजण यावर विश्वास ठेवतात कर, काहींसाठी ही फक्त अफवा आहे. मात्र, तेलंगणामध्ये एका तरुणीच्या लग्नाविषयी जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसू शकतो. तिचे लग्नही एखाद्या स्वप्नासारखेच झाले असून वर उल्लेख केलेली ओळ काहीअर्थी तिच्या लग्नाबाबत लागू ठरते.
तेलंगाणा येथील साबदुल्लापूर गावात राहणाऱ्या मोनिकाचे अनेक वर्षापासून नात्यातीलच राजेश नामक एका तरुणाशी प्रेम होते. मात्र, याबाबत भीतीपोटी तिने घरच्यांना काहीच सांगितले नव्हते. तर, दुसरीकडे आपल्या मुलगी कुण्या दुसऱ्या व्यक्तीला पसंत करते याबाबत मोनिकाच्या आई-वडिलांना किंचीतही माहिती नव्हती. तिच्या पालकांनी एका तरुणाशी लग्न ठरवले. त्यानुसार १२ जूनला तिच्या लग्नसोहळ्याची तारिखही ठरली. ठरलेल्या दिवशी विवाह-सोहळादेखील पार पडला. मात्र, या सोहळ्यात राजेशची उपस्थिती होताच कहाणीत नवीन ट्विस्ट आला. मोनिकाच्या पालकांना याबाबत कळले. त्यांनी मोनिकाशी याविषयी विचारणा केली आणि तिने खरं काय ते पालकांपुढे मांडले. दरम्यान, पोलीसदेखील दाखल झाले. यावेळी मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या चर्चेअंती तिचे आधीचे लग्न रद्द करत दुसऱ्या दिवशी राजेशची तिची लग्नगाठ बांधून देण्यात आली. अशाप्रकारे मोनिका आणि राजेशच्या लग्नाची अजब प्रेमाची गजब लग्नकहाणी सत्यात उतरली.