ओडिशा - श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही ट्रेन तेलंगणाच्या लिंगामपल्ली येथून ओडिशाच्या बालागीर येथे निघाली होती. दरम्यान, माता आणि बाळाला तितलाघर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बाळाला जन्म देणारी मीना कुंभार ही 19 वर्षीय महिला बालागीरच्या थोडिबहाल गावातील आहे. पूर्व कोस्ट रेल्वेच्या कार्यक्षेत्रात श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये जन्मलेले आतापर्यंतचे हे तिसरे बाळ आहे. तर, देशभरात आतापर्यंत श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये तब्बल 37 बाळांचा जन्म झाला आहे.